आयपीएल २०२४मध्ये धावांचा मुसळधार पाऊस पडत आहे. धावांचे नवे विक्रमही बनत आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्याही याच मोसमात झाली. आतापर्यंत आठ फलंदाज असे आहेत ज्यांचा स्ट्राईक रेट २०० पेक्षा जास्त आहे. या फलंदाजामध्ये महेंद्र सिंग दुसऱ्या स्थानी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात दोनच परदेशी आहेत. म्हणजेच यंदाच्या मोसमात भारतीय खेळाडूंवर पॉवर हिटिंगचे वर्चस्व आहे.
२०० च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करणारे फलंदाज
रोमारिओ शेफर्ड
महेंद्रसिंग धोनी
अब्दुल समद
महिपाल लोमरोर
दिनेश कार्तिक
आशुतोष शर्मा
आंद्रे रसेल
नमन धीर
रोमारिओ शेफर्ड
रोमारिओ शेफर्डने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांत त्याला ४ डावात फलंदाजीची संधी मिळाली. ज्यात रोमारिओने २८० च्या स्ट्राईक रेटने ५६ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.
महेंद्रसिंग धोनी
महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. या सात सामन्यांत त्याला ५ डावात फलंदाजीची संधी मिळाली. ज्यात धोनीने २५५.८८च्या स्ट्राईक रेटने ८७ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अब्दुल समद
अब्दुल समदने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. या सहा सामन्यांत त्याला ४ डावात फलंदाजीची संधी मिळाली. ज्यात अब्दुल समदने २२५.५३च्या स्ट्राईक रेटने १०६ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महिपाल लोमरोर
महिपाल लोमरोरने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. या चार सामन्यांत त्याला फलंदाजीची संधी मिळाली. ज्यात महिपालने २०९.०९च्या स्ट्राईक रेटने ६९ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिकने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. या सात सामन्यांत त्याला ६ डावात फलंदाजीची संधी मिळाली. ज्यामध्ये दिनेश कार्तिकने २०५.४५ च्या स्ट्राईक रेटने २२६ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.
आशुतोष शर्मा
आशुतोष शर्माने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. या चार सामन्यांत त्याला फलंदाजीची संधी मिळाली. ज्यामध्ये आशुतोषने २०५.२६ च्या स्ट्राईक रेटने १५६ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.
आंद्रे रसेल
आंद्रे रसेलने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. या सहा सामन्यांत त्याला ४ डावात फलंदाजीची संधी मिळाली. ज्यात आंद्रे रसेलने २०० च्या स्ट्राईक रेटने १२८ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे.
नमन धीर
नमन धीरने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये नमन धीरने २०० च्या स्ट्राईक रेटने ५० धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या या यादीत तो आठव्या क्रमांकावर आहे.