धोनीही जाणार अयोध्येला!

सचिन तेंडुलकर, विराट कोहली नंतर धोनीला मिळाले सोहळ्याचे निमंत्रण

धोनीही जाणार अयोध्येला!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळाले आहे.त्याच्या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीलाही सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-प्रांतीय सचिव धनंजय सिंह यांनी महेंद्रसिंग धोनीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठासाठी निमंत्रण पत्र दिले आहे.महेंद्रसिंग धोनीच्या रांची येथील त्याच्या निवासस्थानी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले.यावेळी भाजपचे राज्य संघटनेचे सरचिटणीस कर्मवीर सिंग देखील उपस्थित होते.साडेपाचशे वर्षांच्या संघर्षानंतर बांधण्यात येत असलेल्या भगवान श्री राम मंदिराचे निमंत्रण मिळाल्याने धोनीला खूप आनंद झाला आणि त्याने श्री राम मंदिर ट्रस्ट आणि त्याला आमंत्रित करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हे ही वाचा:

   नार्वेकरांच्या आदेशाला स्थगिती द्या

देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…

अरुण योगीराज यांनी कोरलेल्या मुर्तीवरच अभिषेक होणार!

अयोध्या: कोण आहेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे संबंध!

याअगोदर १३ जानेवारीला सचिन तेंडुलकरला सोहळ्याचे निमंत्रण मिळाले.त्यानंतर क्रिकेटर विराट कोहलीला देखील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून देशातील प्रतिष्ठित, नामांकित असे सहा हजारहुन अधिक लोकांना निमंत्रण देण्याचे काम सुरु आहे.अनेकांना सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून अजूनही वाटप सुरु आहे.२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा अभिषेक होणार आहे.सोहळ्याची तारीख अगदी जवळ आली आहे.सोहळ्याची तयारीही जोरदार सुरु आहे.हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातील रामभक्त आतुरतेने वाट बघत आहेत.

Exit mobile version