एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

येत्या रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २ जानेवारीला ही परीक्षा होणार होती. मात्र, आता परीक्षा पुढे ढकलली असून परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे. वय वाढलेल्या उमेदवारांनाही या परीक्षेमध्ये संधी देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केले आहे.

कोरोनामुळे याआधीही अनेकदा एमपीएससी परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली होती. पण राज्य सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी एक आदेशही जारी करण्यात आला होता.

राज्यात सध्या ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. वय वाढलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना संधी मिळावी, याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावतील वयोवर्यादा ओलांडलेल्यांना २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येऊ शकणार आहेत.  या अर्जासाठी लागणारे ऑनलाईन शुल्कही देखील ३१ डिसेंबरपर्यंत भरावे लागणार आहे. तर चलनाद्वारे शुल्क भरायचे असल्यास चलनाची प्रत १ जानेवारीपर्यंत घ्यावी लागणार असून त्यानंतर ३ जानेवारीपर्यंत बँकेच्या वेळेत चलनाद्वारे शुल्क भरण्यास मुदत उमेदवारांना देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

चीनने लाखो नागरिकांना लोटले लॉकडाऊनमध्ये

काय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?

दिनेश मोंगियाचा भाजपात प्रवेश

मोदी सरकारच्या योजनेला यश, चीनला डावलून इंटेल भारतात

Exit mobile version