एमपीएससी परीक्षेला कोरोनाचा फटका

एमपीएससी परीक्षेला कोरोनाचा फटका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगायतर्फे ११ एप्रिल रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कोरोना परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या कोरोना परस्थितीचा विचार करताना एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांतर्फे करण्यात आली होती. त्यावरच ठाकरे सरकारने निर्णय घेत ही परीक्षा पुढे ढकलली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर गेली आहे. ठाकरे सरकार हा कोरोना नियंत्रण करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. त्याचा फटका राज्यातील सर्वच घटकांना बसत आहे. एकीकडे राज्यात लावण्यात आलेल्या अघोषित लाॅकडाऊनमुळे जनता त्रस्त आहे. तर त्यातच आता या कोरोना परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसताना दिसत आहे.

हे ही वाचा:

सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही

भारताच्या नौकानयनपटूंनी रचला इतिहास

एबीपीच्या राजीव खांडेकरांना खोट्या बातमीसाठी नोटीस

केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारने ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुपारी या परिक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिक्षा पुढे ढकलण्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. यावेळी पुढे ढकललेली परिक्षा नेमकी कधी होणार या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे एमपीएससी परिक्षेची पुढची तारिख अजूनही गुलदस्त्यातच आहे.

या निर्णयासोबतच ठाकरे सरकारने आपली जुनी परंपरा चालू ठेवली आहे. ती म्हणजे एमपीएससी परीक्षेला काही दिवस बाकी असताना परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेणे. गेल्या वर्षींपासून ठाकरे सरकारने अनेकदा एमपीएससीची परीक्षा अशाच प्रकारे पुढे ढकलली आहे.

Exit mobile version