वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडण्यात आले असून त्याची चर्चा सुरु आहे, हे विधेयक निश्चितपणे पास होईल याचा पूर्ण विश्वास आहे. ओरिजिनल जे विधेयक तयार झाले होते, यामध्ये अमर्याद कायदे होते आणि चुकीच्या पद्धतीने जर निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती. मात्र, आता नव्या विधेयकाने ती मुभा दिली आली आहे. चुका सुधारण्याची संधी दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. हे अतिशय पुरोगामी पद्धतीचे पाऊल आहे. हे विधेयक कोणत्याही समाजाच्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधात नाही. तर पूर्वी झालेल्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते. यामुळे मात्र त्यांच्यावर टाच येणार आहे. म्हणून या बिलाचे आम्ही स्वागत करतो. ज्यांची सद्सदविवेकबुद्धी जागृत आहे ते ते या विधेयकाचे समर्थन करतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
२०१० मध्ये लालूप्रसाद यादव वक्फ बोर्डसंबंधी काय म्हणाले होते? व्हिडीओ होतोय व्हायरल!
पत्राचाळीच्या पुनर्वसित इमारतीतील मूळ ६७२ रहिवाशांना मिळणार हक्काचे घर!
म्हणून सरकार ४०० पार हवे होते…
“नोटबुक उघडलं, पण मार्कशिट मिळाली!”
वक्फ बोर्डाकडे असणाऱ्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालायची आहे म्हणून सुधारणा केली जात आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे, यावर उत्तर देताना ते म्हणाले, याबाबत विरोधकांनी एकही पुरावा अथवा मुद्दा समितीपुढे आणू शकले नाहीत. किंबहुना समितीमध्ये ते निरुत्तर झाले. २५ राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून सुधारणा करण्यात आल्या आहेत.
जेव्हा काही उरत नाही तेव्हा विरोधकांकडून अशा गोष्टी मांडल्या जातात. विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून निर्णय केला तर ते या बिलाच्या बाजूनेच निर्णय करतील. पण त्यांना केवळ लांगुनचालन करायचे आहे, मतांची लाचारी आहे, त्यांना पाय चाटायचे आहेत. म्हणून या बिलाचे विरोध करत आहेत. ज्यांची सद्सदविवेकबुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे कि ते या बिलाला समर्थन देतील, विरोध करणार नाहीत.
सुधारित वक्फ विधेयकामुळे वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळाले आहे, हे अतिशय पुरोगामी पद्धतीचे पाऊल आहे. हे विधेयक कोणत्याही समाजाच्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधात नाही. ज्यांची सद्सदविवेकबुद्धी जागृत आहे ते ते या विधेयकाचे समर्थन करतील!
(माध्यमांशी संवाद | मुंबई |… pic.twitter.com/8JoFvKtK8R
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2025