एमपीएलचा रणसंग्राम आजपासून रंगणार! ऋतुराज आणि केदार आमनेसामने

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित एमपीएल टी- २० क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

एमपीएलचा रणसंग्राम आजपासून रंगणार! ऋतुराज आणि केदार आमनेसामने

इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) थरार संपल्यानंतर क्रिकेट रसिकांना आता महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा उत्साह आणि रोमांच अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एमपीएल या टी- २० क्रिकेट स्पर्धेला गुरुवार, १५ जूनपासून सुरुवात होणार आहे.

एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमवर पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या संघांच्या लढतीने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत असून कोल्हापूर संघाची जबाबदारी केदार जाधवकडे आहे. या स्पर्धेत सहा संघ १४ दिवस लढणार आहेत. तर, १९ सामन्यानंतर एमपीएलचा अंतिम सामना होईल.

पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ स्पर्धेत असून लीग फॉरमॅट पद्धतीने एकमेकांशी झुंजणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. स्पर्धेतील सामने दूरदर्शन डीडी वाहिनीवर, तसेच फॅनोड या स्ट्रीमिंगवरून मोफत पाहता येणार आहेत.

हे ही वाचा:

सोसायटीच्या आवारात लुंगी आणि गाउन घालून फिरू नका!

न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीत!

… म्हणून कोलकातामधील विमानतळावर लागली आग

‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम

पहिल्या सामन्यात ऋतुराज आणि केदार आमनेसामने

ऋतुराज गायकवाडचा पुणेरी बाप्पा आणि केदार जाधवचा कोल्हापूर टस्कर्स या संघांमध्ये रात्री ८ वाजता पहिली लढत रंगणार आहे. त्यामुळे हे दोन्ही स्टार खेळाडू आपल्या संघांसह आमनेसामने येणार आहेत.

Exit mobile version