30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेष१३ वर्षांपासून फरार आरोपी नागपुरात साधूच्या वेशात विकत होता जडीबुटी, पोलिसांकडून अटक!

१३ वर्षांपासून फरार आरोपी नागपुरात साधूच्या वेशात विकत होता जडीबुटी, पोलिसांकडून अटक!

इंदूरमधून आणखी एका आरोपीला अटक

Google News Follow

Related

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील देवरी गावात झालेल्या हत्याकांडातील दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे.१९९१ मध्ये झालेल्या हत्याकांडातील दोंन्ही आरोपी फरार होते.पोलिसांनी अखेर त्यांना अटक केली आहे.विशेष म्हणजे यातील एक आरोपी इंदूरमधील जामगेट-महू येथील पार्वती मंदिरात भगवे वस्त्र परिधान करून साधू बनला होता.तर दुसरा आरोपी नागपुरात जडीबुटी विकत होता.तब्बल १३ वर्षे फरार असणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मछरिया गावात शेतात गुरे घुसल्याच्या वादातून ३३ वर्षांपूर्वी बाबूलाल पचौरी या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.प्रभू दयाळ पचौरी आणि उमाशंकर तिवारी असे आरोपींचे नाव आहे.या दोघांनी बाबुलाल पचौरी यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली होती.या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेची माहिती मिळताच दोघेही पळून गेले. दोघांच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले. दोघेही गेल्या १३ वर्षांपासून फरार होते. पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दोन्ही फरार आरोपींना अटक करण्यासाठी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.अखेर दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे ही वाचा:

अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास, कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय!

वेंगुर्ला बोट दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले!

ठरलं! दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार

छत्तीसगडमध्ये गन पावडरच्या कारखान्यात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

पोलिस ठाण्याचे प्रभारी रोहित डोंगरे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली होती.माहितीच्या आधारे आरोपी प्रभूदयाल पचौरी(६७) याला इंदूरजवळील जामगेट येथील एका देवी पार्वतीच्या मंदिरातून अटक करण्यात आली.आरोपी भगवे कपडे परिधान करून मंदिरात महंत सिद्धेश्वर नावाने वावरत होता.तर दुसरा आरोपी उमाशंकर तिवारीला महाराष्ट्रातील नागपुरातून अटक करण्यात आली.आरोपी उमाशंकर तिवारी हा नागपुरात जडीबुटी विकत होता.या दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा