मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार निर्मला सप्रे यांचा भाजपात प्रवेश!

मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार निर्मला सप्रे यांचा भाजपात प्रवेश!

लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये.मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील बिना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महिला आमदार निर्मला सप्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.

आमदार निर्मला सप्रे या सागर जिल्ह्यात काँग्रेसच्या एकुलत्या एक आमदार होत्या.असता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सागर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार उरलेला नाही. आमदार निर्मला सप्रे या एससी प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा:

“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!

गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!

‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजपचे इतर नेते सतत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.लोकसभा उमेदवार लता वानखेडे यांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सुरखी विधानसभेच्या रहाटगडमध्ये निवडणूक सभा घेतली.या सभेला उपस्थित हजारोंच्या जनसमुदायासमोर काँग्रेसच्या आमदार निर्मला सप्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Exit mobile version