खासदार छत्रपती शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं !

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

खासदार छत्रपती शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं !

खासदार छत्रपती शाहू महाराजांना विशाळ गडावर जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्यात आले आहे. शाहू महाराजांसोबत आमदार सतेज पाटील देखील सोबत होते. मात्र दोघांनाही पोलिसांनी गडावर जाण्यापासून रोखलं आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी दोन्ही नेत्यांना रोखले आहे.

विशाळ गडाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार शाहू महाराज आणि आमदार बंटी पाटील विशाळ गडावर जात होते. तत्पूर्वी पांढरे पाणी याठिकाणी पोलिसांनी दोघांनाही रोखले. पोलिसांनी या ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पावनखिंड, विशाळ गड, आणि गजापूर मार्गावर देखील मोठा पोलीस फौजफाटा उभा आहे. पोलीस अधीक्षकांनी खासदार शाहू महाराज यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. परिसरात कलम-१४४ लागू करण्यात आल्याने कोणालाही गडावर सोडण्यात येणार नसल्याचे अधिकारी म्हणाले. मात्र, यावेळी आमदार सतेज पाटील आक्रमक झाल्याचे दिसले.

आमच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नका मात्र प्रमुख १५ नेत्यांना जाण्यास परवानगी द्या, अशी विनंती सतेज पाटील यांनी पोलिसांना केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, पीडित कुटुंबांशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून परवानगी देण्याची विनंती आमदाराने केली. दरम्यान, प्रशासनाने गडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. परिसरात संचार बंदी लागू असल्याने पत्रकारांनाही गडावर जाऊ दिले जात नसल्याने आतापर्यंत किती अतिक्रमणे काढण्यात आली याची माहिती समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ !

कवी नारायण सुर्वेंच्या घरात केली चोरी पण, नंतर चोर चिठ्ठी लिहित म्हणाला सॉरी…

काँग्रेसचे हिरामण खोसकर नाना पटोलेंवर संतापले!

विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या

Exit mobile version