बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित !

बदलापूरमध्ये चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात काल (२० ऑगस्ट) बदलापूर स्टेशनवर काढण्यात आलेले नागरिकांचे आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बदलापुरातील आंदोलनस्थळी इतर ठिकाणाहून लोक आल्याचेही मुख्यमंत्री शिंदेनी म्हटले आहे. आज (२१ ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बदलापुरातील कालचे आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. कारण आंदोलन इतक्या फटाफट झालं, आंदोलनामध्ये स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या होते आणि गाड्या भरून इतर ठिकाणाहून लोक त्या ठिकाणी आले होते. घटनास्थळी मंत्र्यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरी देखील आंदोलनकर्ते मागे हटण्यास तयार न्हवते. सरकारला बदनाम करणे असा याचा अर्थ होतो. या आंदोलनामध्ये ‘लेक लाडकी बहीण योजने’चे बोर्ड देखील आणले होते, असे कुठे आंदोलन असते का?, असा सवालही मुख्यमंत्री शिंदेनी उपस्थित केला.

हे ही वाचा :

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, भाजपकडून टीकेची झोड !

लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरच्या शाळेला कारणे दाखवा नोटीस

अलिशान कार, कोट्यवधींची घड्याळे जप्त करत मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

 

या घटनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली. राजकारण करायला अनेक विषय आहेत. मात्र, लहान मुलीवर घडलेल्या दुर्दैवी घटनेवर राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला ताब्यात घेतले असून २४ तारखेपर्यंत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version