भारतीय लष्कराच्या शौर्याच्या आणि बलिदानाच्या कहाण्या तुम्ही वाचल्या असतील आणि ऐकल्या असतील. भारतीय सैन्यातही असा एक बकरा आहे जो देशाच्या सेवेत आपले कार्य बजावत आहे. सध्या हा बकरा हवालदार या पदावर असून त्याचे नाव सतवीर असे आहे.
१९६३ ला सतवीर नावाचा उगम – ही कथा १९६३ सालची आहे. युनिटची एक लाँग रेंज पेट्रोल (LRP) आपला मार्ग चुकली होती. यानंतर ते युनिट डोंगरावरील पांढऱ्या रंगाच्या शेळीच्या मदतीने युनिटमध्ये परत येऊ शकले. यानंतर युनिटने पांढरा बकरा दत्तक घेतला. त्या डोंगरावरील पांढऱ्या बकऱ्याला सतवीर (SATVIR) असे नाव देण्यात आले.
सतवीर हे नावही रंजक आहे , एस – म्हणजे युनिट 7 कुमाऊं ,ए – बटालियनचे ब्रीदवाक्य: युद्धाचा सर्व मार्ग, टी- तत्कालीन कमांडिंग ऑफिसर कर्नल थंबू यांच्या नावाने, व्ही- 2 आयसी विश्वनाथनसाठी, आय- त्यावेळचे सर्वात वरिष्ठ कंपनी कमांडर ईश्वर सिंग दहिया यांचे नाव आणि शेवट आर – तत्कालीन सुभेदार मेजर रावत यांचे नाव या सर्वांपासून SATVIR हे नाव देण्यात आले. विशेष नियुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने हे नाव काळजीपूर्वक निवडले होते. १ सप्टेंबर १९६५ रोजी युनिटच्या तिसऱ्या स्थापना दिवशी औपचारिकपणे त्याचे नामकरण करण्यात आले. इतर सैनिकांप्रमाणे या बकरीलाही बढती मिळते. १९६८ मध्ये बकऱ्याला नाईक या पदावर बढती मिळाली. १९७१ मध्ये हवालदार पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
हे ही वाचा:
राजन साळवींच्या बारसू रिफायनरीच्या पाठिंब्यामुळे ठाकरे गटाची गोची
दंतेवाड्यात नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ११ जवान शहीद
फडणवीसांचे सोडा, पक्षातील आमदाराचे अंतरंग तरी कळतात का?
मल्याळी अभिनेता उन्नी मुकुंदनला ४५ मिनिटांत मोदींनी भारावून टाकले!
सतवीरलाही ट्रेनिंग दिल जात-
शारीरिक प्रशिक्षण (PT) परेडमध्ये सैनिकांसोबत धावून SATVIR त्याच्या दिवसाची सुरुवात करतो. आणि क्रीडा परेडमध्ये सहभाग घेऊन संध्याकाळ संपते. या परेडदरम्यान त्यांना त्यांचा गणवेश परिधान करण्यापासून सूट देण्यात आली आहे. तथापि, सर्व औपचारिक प्रसंगी हवालदार SATVIR त्याच्या औपचारिक पोशाखात दिसतात. युनिटला भेट देणाऱ्या व्हीआयपींना अभिवादन करतानाही तो पोशाख परिधान करतो. पूर्वी मॅग्निफिसेंट सेव्हन नावाच्या या बटालियनने आपल्या युनिटचे नाव अभिमानाने बदलून SATVIR बटालियन असे ठेवले.
निवड आणि अंत्यसंस्कार-
या हिमालयीन शेळ्या कुमाऊं टेकड्यांवरील भारत-तिबेट सीमेवरील उंच प्रदेशातून आणल्या जातात. कुमाऊँच्या डोंगरातून निवडलेल्या सर्व शेळ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना सैन्यात भरती केले जाते. पदावरील सगळ्या सतवीरची निवृत्ती साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षी केली जाते. त्यांच्या निधनानंतर लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातात. तीन तोफांच्या सलामीनंतर त्यांना दफन करण्यात येते. डोंगरावरील पांढऱ्या रंगाची शेळी सतवीर ६० वर्षांपासून सैन्यात आहे. हवालदार पदावर असणारा सतवीर ६० वर्षाच्या कालावधीतील सहाव्या क्रमांकाची शेळी आहे. हवालदार सतवीर याची देशात सर्वत्र चर्चा आहे.