एव्हरेस्ट शिखर सर करणारी अरुणाचल प्रदेशातील पहिली व्यक्ती तापी म्रा गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तापी म्रा हे राज्याच्या सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेल्या किरीसाटम पर्वतावर चढाई करण्याच्या अधिकृत मोहिमेवर गेले आहेत. तापी म्रा बेपत्ता झाल्यानंतर, गिर्यारोहण आणि पॅराग्लायडिंग असोसिएशनने सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे ३७ वर्षीय गिर्यारोहकाचा शोध घेण्यासाठी मदतीचे आवाहन केलं आहे.
पॅराग्लायडिंग असोसिएशन ऑफ अरुणाचल प्रदेशचे अध्यक्ष विजय सोनम आणि अरुणाचल प्रदेश पर्वतारोहण संघटनेचे अध्यक्ष सिका गपक यांनी तापी बेपत्ता झाल्याची पुष्टी केली असून त्यांचा शोध सुरू आहे. तापी म्रा पर्वतारोहण संघटनेच्या सरचिटणीसही आहेत. २१ मे २००९ रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर चढाई केली. “तापी म्राचा किरीसाटम चढण्याचा हा चौथा प्रयत्न होता.पुरोइक जमातीतील एक व्यक्ती तापीसोबत किरीसाटम शिखर चढण्यासाठी आली होती, तर इतर पाच जण बेस कॅम्पवर वाट पाहत आहेत. रविवारी सेप्पाला परतलेल्या दाेन जणांनी तापी गायब झाल्याची माहिती दिली.
हे ही वाचा:
‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’
गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार
Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर
…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग भीतीच्या छायेत जगत असताना अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील ३७ वर्षीय ताशी यांगजोम हिने नवा विक्रम केला आहे.२०२१ मध्ये एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली . त्या आधी एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचलेल्या अरुणाचलमधील इतर गिर्यारोहकांमध्ये तापी म्रा (२००९), टायने मेना (२०११), अंशू जमसेनपा (२०११), नीमा लामा आणि काल्डेन पालजोर (२०११), तामे बागंग (२०१३), किशन टेकसेंग (२०११)आणि टाक तामुत (२०१८) यांचा समावेश हाेता.