भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याबद्दल ‘मोटोजीपी’कडून माफी

बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे रंगलेल्या स्पर्धेदरम्यान घडली घटना

भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याबद्दल ‘मोटोजीपी’कडून माफी

नोएडा येथे रंगलेल्या ‘इंडियन ऑइल ग्रँड प्रिक्स ऑफ इंडिया’ स्पर्धेचे लाइव्ह टेलिकास्ट सुरू असताना भारताचा फेरफार केलेला नकाशा प्रसिद्ध करण्यात आला होता. या प्रकाराबद्दल ‘मोटोजीपी इंडिया’ने माफी मागितली आहे.

 

 

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे ही स्पर्धा रंगली होती. ‘मोटोजीपी इंडिया’ने ‘एक्स’च्या माध्यमातून जाहीरपणे माफी मागितली आहे. ‘मोटोजीपी ब्रॉडकास्टचा एक भाग म्हणून पूर्वी दाखवलेल्या नकाशाबद्दल आम्ही भारतातील आमच्या चाहत्यांची माफी मागू इच्छितो. आमच्या यजमान देशाचे समर्थन आणि कौतुक करण्याव्यतिरिक्त कोणतेही विधान करण्याचा आमचा हेतू नाही,’ असे त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे.

हे ही वाचा:

खलिस्तानी दहशतवादी निज्जरचे पंजाबमधील घर जप्त होणार

सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट ५ कामगार ठार, अनेक जखमी

शरद पवारांनी केले अदानींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

ऑस्ट्रेलियावर मात करत भारत ठरला क्रमांक एकचा एकदिवसीय क्रिकेट संघ

 

‘मोटोजीपी’ने लाइव्ह टेलिकास्ट करताना दाखवलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश नसल्याचे एका सोशल मीडिया वापरकर्त्याने निदर्शनास आणले होते. त्यानंतर ‘मोटोजीपी इंडिया’ने या तक्रारीची नोंद घेतली आणि जाहीरपणे माफी मागितली. मोटोजीपी हे ‘मोटरसायकल ग्रँड प्रिक्स’चे लघुरूप आहे. मोटोजीपी हे लहान मोटरसायकल रोड रेसिंग स्पर्धा आयोजित करण्यासाठी ओळखले जाते.

Exit mobile version