28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषअसे आहे 'मुळशी पॅटर्न' चे 'अंतिम' हिंदी रुप! पोस्टर प्रदर्शित

असे आहे ‘मुळशी पॅटर्न’ चे ‘अंतिम’ हिंदी रुप! पोस्टर प्रदर्शित

Google News Follow

Related

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार सलमान खान याचा ‘अंतिम – द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट येऊ घातला आहे. मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर करण्यात आली नसली तरीही चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून प्रदर्शनाची उत्सुकता रसिक चाहत्यांना आत्तापासूनच लागली आहे.

मंगळवारी सलमान खान याने आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंट वरून ‘अंतिम’ चे पोस्टर प्रसिद्ध केले. ‘बुराई के अंत की शुरुवात. गणपती बाप्पा मोरया.’ असे लिहीत सलमानने हे पोस्टर प्रसिद्ध केले. अभिनेता सलमान खान हा मोठा गणेश भक्त म्हणून प्रसिद्ध आहे. सलमानच्या घरी दरवर्षी गणपती बसतो. दरवर्षी खान कुटूंबात बाप्पाचे आगमन आणि विसर्जनही वाजत-गाजत होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माहोल मध्येच सलमानने आपल्या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे.

हे ही वाचा:

कोरोना काळात फुलविक्रेत्यांचे चेहरे कोमेजले!

५० कोटींचा दावा खुशाल टाकावा, मी घाबरत नाही

शार्दूल ठाकूरवर अन्याय झाला का?

मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने विकृत निर्ढावलेले

‘अंतिम – द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठीत सुपरहिट ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात सलमान खान हा एका पंजाबी पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष शर्मा हा एका गॅंगस्टरची भूमिका साकारत आहे. सलमान खान फिल्म्सतर्फे हा चित्रपट सादर केला जात असून सलमा खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

गेल्यावर्षी डिसेंबर २०२० मध्ये या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रसिद्ध करण्यात आला होता. या फर्स्ट लुकला साठ लाखांपेक्षाही अधिक वेळा युट्युब वर पाहिले गेले आहे. ‘अंतिम’ च्या मोशन पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तर आता चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याकडे रसिक डोळे लावून बसले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा