जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे आज उद्घाटन

जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे आज उद्घाटन

आज जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन भारतात होणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद अहमदाबाद येथील स्टेडियमचे उद्घाटन करणार आहेत. मोटेरा स्टेडियम नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे. भारताचे क्रिडामंत्री किरण रिजिजू यांनी काल या स्टेडीयमची पाहणी केली असून त्यासंबंधी ट्विट केले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात अतिशय चुरशीची मालिका सुरू आहे. या मालिकेचा तिसरा सामना जगातील सगळ्यात मोठ्या मैदानावर आयोजित केला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन होणार आहे. मोटेरा हे जगातले सगळ्यांत मोठे क्रिकेटचे मैदान असून जगातल्या सर्व मैदानांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो.
२०१५ साली जुने क्रिकेट स्टेडियम पाडून नव्या स्टेडियमच्या बांधकामाला सुरूवात झाली. या नव्या स्टेडीयमची कल्पना नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मांडली होती. त्यावेळी ते गुजरात क्रिकेट महामंडळाचे अध्यक्षही होते. या स्टेडियमच्या बांधणीसाठी तब्बल ८०० कोटी रूपये इतका खर्च आल्याचे समजते. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले असताना त्यांचा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम याच मैदानावर पार पडला होता.
Exit mobile version