24 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरविशेषमोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदच्या जागेचा लिलाव!

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदच्या जागेचा लिलाव!

दाऊदच्या मालकीच्या चार जागांचा पुढील महिन्यात होणार लिलाव

Google News Follow

Related

डी-कंपनी नामक संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख, गुन्हेगारी जगतातील बादशाह आणि मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याची बरीच मालमत्ता भारतात आहे.भारतातील त्याच्या मालकीच्या जागेचा आता लिलाव होणार आहे.

डी-कंपनी म्हटले की, सर्वांसमोर उभा राहतो तो म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा चेहरा.मात्र, मागील काही वर्षांपासून दाऊद इब्राहिमबद्दल फारशी माहिती समोर येत न्हवती.तो कुठे राहतो, काय करतो, कसा दिसतो याची कोणालाच काही कल्पना न्हवती.परंतु गेल्या आठवड्यात एक बातमी समोर आली ती म्हणजे दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथे असून त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला आणि त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.तसेच त्याची प्रकृतीही गंभीर असून तो अखेरच्या घटना मोजत असल्याचे वृत्त समोर आले.या बातमीने देशाच्या नाहीतर जगाच्या भुवया उंचावल्या.

मात्र, या बातमीत काही तथ्य नसल्याचे समोर आले.दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकीलने याची पुष्टी केली.छोटा शकील याने आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी अफवा असून तिला कोणताही आधार नसल्याचा दावा केला आहे. तो १००० टक्के फिट असल्याचे छोटा शकीलने सांगितले.मुंबई पोलिसांनी देखील हा दावा फेटाळून लावला.मात्र, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याची बरीच मालमत्ता भारतात आहे.दाऊद इब्राहिम याच्या नावावर असलेल्या जागेचा पुढल्या महिन्यात लिलाव होणार आहे.

हे ही वाचा:

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजसाठी ‘राम सिया राम’

तामिळनाडूमध्ये आपत्ती असताना एमके स्टॅलिन इंडी आघाडीच्या बैठकीत रमले होते

ब्रिटिशकालिन कायदे बदलले हा ऐतिहासिक क्षण!

सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षात निकाली काढले ५२ हजार खटले!

५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव होणार आहे.दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी मुंबके येथील चार जागांचा लिलाव होणार आहे. दाऊद इब्राहिमच्या नावावर चार शेत जमिनी असून जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव होईल. त्या चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत ९ लाख ४१ हजार २८० रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही ८ लाख ८ हजार ७७० रुपये इतकी आहे.मुंबके परिसरातील दाऊद इब्राहिम याच्या चार जागा सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी या लिलावाबाबत सराकारतर्फे नोटीस काढण्यात आली होती. आता ५ जानेवारीला या जागांचा लिलाव होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील रत्नागिरीत २७ डिसेंबर १९५५ ला गुन्हेगारी जगतातील बादशहा दाऊद इब्राहीम चा जन्म झाला. त्याचे वडील शेख इब्राहीम अली कासकर मुंबई पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. आईचे नाव अमिना बी होते. पैसे कमावण्याच्या लालसेने सुरुवाती पासूनच दाऊद इब्राहीम ने गुन्हेगारी जगताकडे जाणारा मार्ग निवडला.आणि त्यामुळे शाळा त्याने अर्ध्यातच सोडली. युवा अवस्थेतच त्याला दारू पिणे व्यसनं करणे यासारख्या वाईट सवयींनी जखडले इतकेच नव्हे तर या सवयींच्या आहारी गेलेला दाऊद त्या पूर्ण करण्याकरता लहान वयातच चोरी, ड्रग्स सप्लाय, दरोडे, लुटमारी सारखे जगन्य अपराध करू लागला.

दाऊद इब्राहीम मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि त्याच्या टीम मध्ये सहभागी झाला आणि मोठ-मोठ्या गुन्ह्यांना तडीस नेऊ लागला.८० च्या दशकात दाऊद चे नाव अपराध जगतातील सगळ्यात मोठे नाव झाले होते.चित्रपटांना फायनान्स करण्यापासून ते सट्टेबाजी विश्वात त्याच्या नावाचा दबदबा होता.मात्र, सध्या त्याची फारशी चर्चा न्हवती.परंतु काही दिवसांपूर्वी दाऊद याच्यावर विषप्रयोग झाल्याची आणि त्याच्यावर कराचीयेथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी बातमी समोर आली.या बातमीने देशभरात एकच खळबळ उडाली.जरी ही बातमी खोटी असली तरी दाऊदने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा