आयसी-८१४ वेबसीरिजवर माजी लष्करप्रमुख वैतागले, गंभीर घटना पण अव्यावसायिक चित्रण

वेबसीरीजला १० पैकी २ रेटिंग

आयसी-८१४ वेबसीरिजवर माजी लष्करप्रमुख वैतागले,  गंभीर घटना पण अव्यावसायिक चित्रण

‘IC 814 : द कंदाहार हायजॅक’ या वेबसीरीजमुळे २५ वर्षापूर्वीची विमान अपहरणाची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक मुद्यांवर वाद निर्माण झाले आहेत. वेबसीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या घटनेवर बोट ठेवून अनेकांनी आक्षेप घेत टीका केली आहे. आता यामध्ये माजी लष्करी कमांडर कंवल जीत सिंग ढिल्लन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काही मिनिटांनंतर वेबसिरीस पाहू शकणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

माजी लष्करी कमांडर कंवलजीत सिंग ढिल्लन यांनी ट्विट करत, अत्यंत गंभीर घटनेचे सर्वात अव्यावसायिक चित्रण असल्याचे म्हटले आहे. १५ कॉर्प्सचे कमांडर म्हणून काम केलेले धिल्लन पुढे म्हणाले, काही मिनिटांच्या पुढे वेब सीरिज पाहू शकत नाही, अत्यंत टाळता येण्याजोगी. त्यांनी ट्वीटकरत या वेबसीरीजला १० पैकी २ रेटिंग दिले आहेत.

वेब सीरिज एका सत्यघटनेवर आधारित आहे, यामध्ये दाखविण्यात आलेल्या नावावरून देखील नुकताच वाद झाला होता. दिल्लीला जाणारे भारतीय प्रवासी विमान – IC 814 – हे विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच पाच मुस्लिम दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. अपहरणकर्ते मुस्लिम होते पण त्यांनी चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी हिंदू सांकेतिक नावे वापरली. यावरून अनेकांनी आवाज उठवल्यानंतर अखेर त्यांची खरी नावे डिस्क्लेमरमध्ये जाहीर करण्यात आली.

यावरून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, IC-814 चे अपहरणकर्ते भयंकर दहशतवादी होते, ज्यांनी त्यांची मुस्लिम ओळख लपवण्यासाठी उपनावांचा वापर केला, परंतु अनुभव सिन्हा यांनी त्यांची गैर-मुस्लिम नावे पुढे करून त्यांच्या गुन्हेगारी हेतूला कायदेशीर मान्यता दिली आहे.

हे ही वाचा : 

संख्याबळाच्या आधारेच मुख्यमंत्री ठरणार!

सहा दिवसांमध्येचं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात २० पदके!

टेक्सासमध्ये भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

 

Exit mobile version