बारावीचा निकाल यंदा फर्स्ट क्लास! त्यामुळेच वाढली चिंता

बारावीचा निकाल यंदा फर्स्ट क्लास! त्यामुळेच वाढली चिंता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल मंगळवारी लागला. यावर्षीच्या निकालात जास्तीत जास्त विद्यार्थी हे प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत. केवळ ९९,१०० विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीने म्हणजेच ४५ टक्के ते ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. केवळ पास अशा श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. २०२० मध्ये पास या श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या ६८,९४१ इतकी होती तर यंदा ही संख्या २,६२२ इतकी आहे.

प्रथम श्रेणी आणि त्यावरील गुण मिळवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तीन विद्यार्थ्यांमागे एका विद्यार्थ्याला ८० टक्के गुण मिळाले आहेत. घरातून होणाऱ्या परीक्षा, असाईनमेंटचे गुण आणि पर्यायातून निवडून उत्तरे लिहा यामुळे बारावीच्या निकालातून दुसरी श्रेणी हा गटच जवळजवळ नाहीसा झाला आहे. दहावीतील जास्त गुण असलेले तीन विषय, अकरावीतील चाचणी परीक्षा आणि सत्र परीक्षा यांचे गुण आणि बारावीत झालेल्या वर्गातील चाचण्या या आधारे बारावीचे गुण देण्यात आले होते.

हे ही वाचा:

प्रत्येक हॉकी खेळाडूसाठी पंतप्रधान मोदींचे खास ट्विट

ऑफिसमध्ये १०० टक्के उपस्थिती हवी, पण जायचे बसनेच!

२०२१ शिखर सावरकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनाला राम राम

‘विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांसाठी कोणीही दोषी नाही, पण हे गुण म्हणजे विद्यार्थ्यांची खरी ओळख नाही.’ असे मत वझे – केळकर कॉलेजचे प्राचार्य विद्याधर जोशी यांनी व्यक्त केले आहे. वाडा येथील आ. दौलत दरोडा सायन्स कॉलेजचे प्राचार्य यांनी जास्तीत जास्त मुलांना ९० आणि ८० टक्के मिळाल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आम्हाला बहुतेक तोंडी परीक्षा घ्यावी लागणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

Exit mobile version