नवजात जन्मतः हृदयविकार असलेल्या लेकीच्या उपाचारासाठी एका पित्याने सातासमुद्रापार मॉरिशसहून थेट नवी मुंबई गाठली. नवी मुंबईतील नेरूळ येथील अपोलो रुग्णालयामध्ये या पाहुण्या परदेशी बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मॉरिशिस येथे २८ जुलै रोजी या बाळाचा जन्म झाला. ती जन्मजातच गंभीर स्वरूपाच्या हृदयविकाराने ग्रस्त होती.
डायना नावाच्या मुलीला जन्मतःच सायनोसिस झाला होता. त्यामुळे या बाळाची त्वचा, नखे, ओठ आणि डोळ्याकडील भाग निळसर किंवा करडा दिसत होता. बाळाला वाल्वुलर पल्मोनरी एट्रेशिया झाल्याचे निदान करण्यात आले. या आजारामध्ये हृदयातून फुफ्फुसांकडे जाणारा रक्तप्रवाह नियंत्रित करणारा वाल्व उघडत नाही. यामुळे हे बाळ पेटंट डक्टस अरट्रेशियसवर जिवंत होते. तिला आयसीयू मध्येही ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा:
मोदींना आव्हान देण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये नाही… का म्हणतोय काँग्रेसचा नेता?
“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी
लालबहादूर शास्त्री एक सालस राजकारणी
… म्हणून वाडा कोलमची अस्सल चव राहणार टिकून!
दरम्यान बाळाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मॉरिशस सरकारने तिला पुढील उपचारांसाठी नवी मुंबईत पाठवण्यात आले. आरोग्याची गंभीर परिस्थिती पाहता अपोलोच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी तातडीने डायनाला २४ तासांपेक्षा कमी वेळात कार्डियाक प्रक्रियेसाठी कॅथ लॅबमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच बाळाची हृदय प्रक्रिया अचानक बंद झाल्याने चिमुकल्या बाळाला चार ते सहा वेळा शॉक देण्याची वेळ आली.
शॉक ट्रीटमेंट नंतर पुढच्या काही मिनिटांत बाळाच्या हृदयाने पुन्हा गती प्राप्त केली आणि बळाची प्रकृती स्थिर झाल्यावर डॉ. भूषण चव्हाण यांनी हृदय आणि फुफ्फुस यांच्यामधील बिघडलेला वाल्वच्या आत बलून कॅथेटर वापरून अरुंद पाल्मोनरी वाल्व रुंद करण्यात आली. त्यानंतर बाळाला आयसीयूमध्ये ठेवून १० दिवसांनी बाळाच्या आरोग्य संबंधीच्या सर्व समस्या दूर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.