वाहनांच्या आता इथेही वाढल्या रांगा

वाहनांच्या आता इथेही वाढल्या रांगा

गेल्या दोन आठवड्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरांत पाणी तुंबण्याच्या घटना घडल्याने लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यात आता भर पडली आहे एका नव्या चिंतेची.

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, इमारतींचे तळमजले, वाहनतळ, बैठय़ा चाळी अक्षरश: पाण्यात बुडाल्या होत्या. परिणामी या पावसात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळेच सध्याच्या घडीला मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली इथली गॅरेजेस आता वाहनांच्या दुरुस्तीसाठी सज्ज झाली आहेत. वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक वाहनांचे खूपच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. पावसात बिघडलेल्या वाहनासाठी कंपनीची विशिष्ट कार्यपद्धती आहे. ज्यामध्ये वाहनाची पाहणी केली जाते. नुकसानीचा अंदाज घेतला जातो, दुरुस्तीची रक्कम कळवली जाते, विमा पाहिला जातो आणि मग वाहन दुरुस्तीसाठी येते.

पाण्यामुळे तर वाहने खराब झालीच आहेत पण रस्त्यांची जी चाळण झाली आहे, त्यामुळेही वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळेही गॅरेजमध्ये अशा बिघडलेल्या, नादुरुस्त झालेल्या, टायर पंक्चर झालेल्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच सद्य़स्थितीला मुंबईसह उपनगरांमधील वाहन दुरुस्तीच्या दुकानांबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड झालेला असल्यामुळे आता वाहनचालकांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. गाड्यांच्या रांगा गॅरेजमध्येही लागल्यामुळे काही दिवस वाट पाहून मगच गाडी ताब्यात मिळणे शक्य आहे.

हे ही वाचा:

पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ करा

…असा मिळाला सचिनला त्याचा नवा पार्टनर!

वरळी कोळीवाड्याच्या किनाऱ्यालगत सुसज्ज अनधिकृत घरे…

फडणवीस-ठाकरे भेट का झाली? कुठे झाली?

लोकल रेल्वे बंद असल्यामुळे खासगी वाहनांवरच लोकांचा भर आहे. पण पावसामुळे, खड्ड्यांमुळे वाहनांची दशा झाल्यानंतर लोकांनी प्रवास तरी कशाने करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कांदिवली भागातील ठाकूर कॉम्प्लेक्समधील मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये पावसाचं पाणी मोठ्याप्रमाणावर साचल्याचं समोर आलं आहे. शिवाय जवळपास ४०० वाहनं या पाण्याखाली गेली होती. चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान या पावसाच्या पाण्यामुळे झाले. गाडीच्या इंजिन आणि अन्य भागांसोबत गाडीतील कार्पेट, आसनेदेखील भिजली आहेत. त्यामुळे या वाहनांच्या दुरुस्तीला वेळ लागत आहेत. यामध्ये काही वाहने त्याच कंपनीकडे तर काही वाहने खासगी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी जात आहेत. ‘वाहनाचे नुकसान किती झाले आहे त्यावर त्याच्या दुरुस्तीला लागणारा वेळ ठरतो. सध्या अधिकचे मनुष्यबळ वापरून चार ते पाच दिवसांत वाहने दुरुस्त करून दिली जात आहेत.

Exit mobile version