ट्रिपल सीट दुचाकीस्वारांची गर्दी वाढली

ट्रिपल सीट दुचाकीस्वारांची गर्दी वाढली

मुंबईमध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणारे दिवसागणिक आता वाढू लागलेले आहेत. बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा आता उगारण्यात येत आहे.

मुख्य म्हणजे ट्रिपल सीट दुचाकीस्वारांची संख्या सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दुचाकीचालक हे नियम मोडण्यात अग्रेसर आहेत हेच आता दिसून आलेले आहे. विरुद्ध दिशेने गाडी न चालविणे, दुचाकीवर मागच्या सीटवर केवळ एका व्यक्तीलाच बसविणे, नियंत्रित वेगात गाडी चालविणे हे कुठलेही नियम दुचाकीचालक सध्या पाळताना दिसत नाहीत असे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळेच अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र ट्रॅफिक विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत सहा लाख हेल्मेट न घालणारे दुचाकी चालक यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर प्रथम तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दुचाकी चालवत असताना जर कधी अपघात झाला तर त्यामध्ये जीव वाचावा म्हणून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र हेल्मेट घालणं काहींना त्यांच्या शानच्या विरोधात वाटतं आणि अशा लोकांमध्ये पुणेकर पहिल्या तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नियम मोडणारे दिवसागणिक आता वाढू लागलेले आहेत. त्यामुळे आता यांना आवर कसा घालायचा असाच प्रश्न पडलेला आहे. अनेक दुचाकीचालक तीन जण बसून सर्रास फिरताना दिसतात.

हे ही वाचा:

‘पेंग्विन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी’

जाहीर चर्चा करा नाही, तर जाहिररित्या माफी मागा

पंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा

…आणि असे झाले ३० कोटींचे ‘बेस्ट’ नुकसान

जानेवारीपासून ते मे पर्यंत महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक विभागाकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामध्येच दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक विभागाकडून गेल्या दोन महिन्यांपूर्वी फक्त दहा शहरांचे आकडे जाहीर करण्यात आले होते. दुचाकी चालवताना हेल्मेट खालणे हे बंधनकारक आहे मात्र तरीसुद्धा बहुतांश लोकांना बाईक चालवताना हेल्मेट घालणे हा महत्त्वाचा भाग वाटत नाही. ज्यासाठी त्यांच्याकडे विविध कारणे तयार असतात.

Exit mobile version