विशाळ गडावरील अतिक्रमण निर्मूलनाचे काम दुसऱ्यादिवशीही सुरु होते. यामध्ये निवासी नसलेली आणि कोर्टमध्ये स्टे नसलेली अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत. कोल्हापूर जिल्हा आणि विशाळ गड परिसरात सध्या शांतात असून प्रशासन सर्व गोष्टींवर प्रशासन लक्ष ठेवून आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
विविध हिंदू संघटना आणि शिवभक्तांच्या मागणीनंतर प्रशासनाने विशाळ गडावरील वाढलेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात संचार बंदी लागू करत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, विशाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमधील मुसलमान वाडी परिसरामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार झालेले आहेत. याबाबत मदत मिळण्यासाठीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्या ठिकाणी बचावकार्य प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे.
हे ही वाचा:
दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कोणाकडे राहायला होता याची चौकशी होणार
मुंबई विमानतळावर ९ कोटी किमतीचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?
महायुती सरकारची नवी योजना; विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १० हजार
ते पुढे म्हणाले की, सलग दुसऱ्यादिवशी गडावरील अतिक्रमण निर्मूलनाचे काम सुरु होते. त्यामध्ये जे काही निवासी नसलेली आणि कोर्टमध्ये स्टे नसलेली अतिक्रमणे होती, अशी जवळपास ९० ते १०० अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात आणि गड परिसरात शांतात आहे. पोलीस आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतात ठेवावी, संबंधित प्रकरणाशी व्हिडिओ-फोटोज शेअर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. अशा प्रकारची कृती केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.