हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील कालका येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. हरियाणा रोडवेजच्या मिनी बसला अपघात झाला आहे. डाक्रोग गावाजवळ हा अपघात होऊन अपघातात ४० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हरियाणा रोडवेजची बस नियंत्रणाबाहेर जाऊन खड्ड्यात पडली. या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले असून जखमींना पंचकुलाच्या सेक्टर ६ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हरियाणा रोडवेजची मिनी बस डाक्रोग गावाजवळ असताना बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. अपघाताचे कारण ओव्हर स्पीड असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय बसही ओव्हरलोडही होती. ज्या रस्त्याने हा अपघात झाला त्या रस्त्याची दुरवस्था हे देखील अपघाताचे कारण असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात बस कंडक्टरही जखमी झाला आहे. बसमध्ये उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक भरले होते. त्यामुळे खराब रस्त्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली.
हे ही वाचा:
मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका; रेल्वे रुळांवरून चालत गाठले स्थानक
पावसाने मुंबईला झोडपलं; रेल्वेसेवा खोळंबली, रस्ते वाहतूक धीम्या गतीने
‘हाथरसच्या गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने लोक गुदमरले’
महुआ मोईत्रांना वक्तव्य भोवणार, एफआयआर दाखल!
पंचकुलाचे सीएमओ डॉ. मुक्ता कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, पंचकुलाच्या सेक्टर ६ मधून २२ जखमी मुलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. तर अनेक जखमी मुलांना देखील पिंजोर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. एक महिला गंभीर जखमी झाली आहे.