‘आदिपुरुष’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी, ३६ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली

१६ जून रोजी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

‘आदिपुरुष’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी, ३६ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली

रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा सध्या चर्चेत असून १६ जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सिनेमाची ३६ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

‘आदिपुरुष’च्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून या सिनेमाचे पीवीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसचे मिळून ३६ हजाराहून अधिके तिकिटे विकली गेली आहेत. केवळ हिंदी वर्जनमधून हा सिनेमा १.४० कोटींची कमाई करू शकतो, असे म्हटले जात आहे.

‘आदिपुरुष’ हा सिनेमा अनेक मुद्द्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तरीही, या सिनेमाची चाहत्यांमध्ये आणि सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. करोनाकाळानंतर संथ गतीने सुरू असलेल्या या क्षेत्राला ‘पठाण’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरळ स्टोरी’ सारख्या सिनेमांनी चांगले दिवस आणले.

हे ही वाचा:

अमेरिकेतील भारतीय रेस्टॉरंटमध्ये ‘मोदीजी की थाली’

मालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न

भारताच्या पराभवानंतर गावस्कर संतापले

शरद पवार धमकी प्रकरणी एका इंजिनिअरला अटक

भूषण कुमार निर्मित आणि ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या सिनेमात प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, देवदत्त नागे हे मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात प्रभास श्रीरामांच्या, क्रिती सेनन सीता मातेच्या, सैफ अली खान रावणाच्या आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version