पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव

भेट म्हणून नरेंद्र मोदी यांना मिळालेला १ हजार २०० हून अधिक वस्तूंचा लवकरच लिलाव होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळाडू, राजकारणी, नेते मंडळींकडून अनेक वस्तू भेटवस्तू म्हणून देण्यात येतात. अशाच भेट म्हणून नरेंद्र मोदी यांना मिळालेला १ हजार २०० हून अधिक वस्तूंचा लवकरच लिलाव होणार आहे. तसेच या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम ‘नमामि गंगे मिशन’साठी वापरली जाणार आहे.

विविध मान्यवरांकडून नरेंद्र मोदी यांना अनेक वस्तू भेटी दरम्यान दिल्या जातात. नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूमध्ये अनेक मौल्यवान वस्तू आहेत. लिलावासाठी ठेवल्या जाणार्‍या वस्तूंची किंमत १०० रुपये ते १० लाख रुपयांपर्यंत असणार आहे. तसेच या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळणारी सर्व रक्कम मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘नमामि गंगे’साठी वापरली जाणार आहे. १७ सप्टेंबर रोजी या वस्तूंचा लिलाव होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होण्याची ही चौथी वेळ असून हा लिलाव फक्त ऑनलाइन असणार आहे.

हे ही वाचा:

राडा करणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची शाबासकीची थाप

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी सांगितला पेशव्यांचा पराक्रम

प्रभादेवीत ‘त्या’ ठिकाणी सापडली काडतुसाची रिकामी पुंगळी

कोकण रेल्वे आता विद्युत इंजिनच्या सहाय्याने धडधडणार

या वस्तूंच्या यादीमध्ये सूर्य पेंटींग, त्रिशूळ, महाराष्ट्रातील कोल्हापुरात असलेल्या महालक्ष्मीची मूर्ती, भगवान व्यंकटेश्वराचे चित्र यांचा समावेश असणार आहे. तसेच विविध स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, भाला आणि रॅकेट यांसारख्या क्रीडा वस्तूंचा देखील समावेश असणार आहे. यासोबतच चित्रे, शिल्पे आणि लोककलाकृतींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अयोध्येतील श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराचे मॉडेल यांचा देखील समावेश असणार आहे.

Exit mobile version