24 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषएनडीए मध्ये महिला ठरल्या सरस...

एनडीए मध्ये महिला ठरल्या सरस…

Google News Follow

Related

नॅशनल डिफेन्स अकॅडेमी (NDA) परीक्षेत एकूण आठ हजार यशस्वी उमेदवारांपैकी एक हजाराहून अधिक महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) १४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेला महिला उमेदवारांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ होती आणि पहिल्याच वेळेत महिला उमेदवारांनी उत्तम कामगिरी केली आहे.

एनडीएमध्ये उत्तीर्ण झालेल्या १ हजर २ महिला उमेदवार सेवा निवड मंडळ आणि त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी उपस्थित राहतील. या सर्व महिला उमेदवारांमधून १९ महिला उमेदवार पुढील वर्षीच्या एनडीए अभ्यासक्रमासाठी निवडल्या जातील. निवड झालेल्या उमेदवार सैन्य, नौदल आणि भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून सेवा बजावतील. एनडीए पुढील वर्षी एकूण ४०० कॅडेट्सना प्रवेश देणार आहे, ज्यामध्ये १० महिलांसह २०८ उमेदवारांना सेवेत घेणार आहे. नौदलात तीन महिलांसह ४२ उमेदवार असतील, तर आयएएफ १२० उमेदवारांना प्रवेश देणार आहेत, त्यापैकी सहा महिला असतील.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत सांगितले की, परीक्षेसाठी एकूण अर्जदारांची संख्या ५ लाख ७५ हजार ८५६ होती आणि त्यापैकी १ लाख ७७ हजार ६५४ महिला होत्या. एनडीए आपल्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करत आहे, एक मजबूत सुरक्षा यंत्रणा तयार करत आहे आणि महिला प्रशिक्षक, स्त्रीरोग तज्ञांसह डॉक्टर आणि इतर आवश्यक सहाय्यक कर्मचार्‍यांची नियुक्ती सुरू करत आहे. तसेच पुढील वर्षी प्रथमच महिला कॅडेट्सच्या कॅम्पसमध्ये स्वागत करण्यासाठी इतर पावले उचलत आहे.

हे ही वाचा:

सुपे हे परीक्षा विभागातील वाझे

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

बेस्ट मुख्यमंत्र्यांचा घरातून चालवलेला ‘बेस्ट कारभार’

‘बलात्कार टाळू शकत नसाल तर त्याची मजा घ्या’ काँग्रेस आमदाराची मुक्ताफळे

पुण्याच्या खडकवासला येथे एनडीएचे औपचारिक उद्घाटन १९५५ मध्ये झाले. सध्या एकूण १८ स्क्वॉड्रन आहेत, ज्यात प्रत्येकी १२० कॅडेट्स आहेत. संस्थेकडे सध्या सहा टर्ममध्ये सुमारे २ हजार २० कॅडेट्स आहेत. बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर कॅडेट्स त्यांच्या प्री- कमिशनिंग प्रशिक्षणासाठी एनडीए मध्ये सामील होतात. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सहा लाखांहून अधिक उमेदवार एनडीए प्रवेश घेतात आणि संरक्षण सेवा परीक्षांसाठी अर्ज करतात. यूपीएससी द्वारे परीक्षा घेतल्या जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा