दक्षिण आफ्रिकेमधून आलेला ओमिक्रोन आता देशात आणि राज्यात हातपाय पसरत आहे. राज्यातील ओमिक्रोन बाधितांची संख्या आता शंभरी पार पोहचली आहे. ओमिक्रोन संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. शनिवारच्या आकडेवारीनुसार देशात ओमिक्रोन रुग्णांची संख्या ४०० पार पोहचली होती. चिंतेची बाब म्हणजे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रासहित १७ राज्यांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत.
शनिवार २५ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार देशात ४१५ ओमिक्रोन रुग्ण होते, तर राज्यात ११० रुग्णांची नोंद आहे. सर्वात जास्त धोका हा महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात राज्यांना असल्याचे वृत्त आहे. ओमिक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेशनचा विचार करून अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाचा वेग मंदावत असतानाच ओमिक्रोनच्या वाढत्या रुग्णांनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी मुलांसाठी केली ही घोषणा
खरोखरच नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, कृषि कायदे परत आणण्याबद्दल?
सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात
८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन
देशात पाहिले दोन ओमिक्रोन रुग्ण कर्नाटकमध्ये सापडले होते. त्यातील एक व्यक्ती हा परदेशातून प्रवास करून आला होता. मात्र, दुसऱ्या व्यक्तीला कुठलाही प्रवासाचा इतिहास नसताना बाधा झाली होती. दरम्यान महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्येही ओमिक्रोनचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला. आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात शुक्रवार मध्यरात्रीपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.