उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० हून अधिक भाविकांचा मृत्यू

सात जण जखमी; बचावकार्य सुरू

उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० हून अधिक भाविकांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर, सात जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून ही गाडी उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये बद्रीनाथ महामार्गावर हा अपघात झाला. टेम्पो नदीत पडल्यामुळे अनेक भाविक मृत्युमुखी पडले आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गाडीत सुमारे २३ प्रवासी असल्याची माहिती आहे. टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडली. या अपघातात दहा पर्यटकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. सर्वजण बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे पर्यटक दिल्लीतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा..

‘जी ७ शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदी मायदेशी परतले’, ‘इटलीचे मानले आभार’!

आगीच्या अफवेवरून ट्रेनमधील प्रवाशांनी मारल्या उड्या, तिघांचा मृत्यू!

केजारीवालांचा न्यायालयातील व्हिडीओ पोस्ट प्रकरणी पत्नी सुनीता यांना नोटीस

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाने ८ नक्षलवादी टिपले, एक जवान हुतात्मा!

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीमही घटनास्थळी रवाना झाली आहे बचावकार्य सुरू झाले आहे. या अपघातावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवर लिहिले की, “रुद्रप्रयाग जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.”

Exit mobile version