24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसगळ्यांना हवीहवीशी वंदे भारत; मागणी वाढली

सगळ्यांना हवीहवीशी वंदे भारत; मागणी वाढली

मार्चपर्यंत एकूण १६ वंदे भारत गाड्या रुळावर आणणार

Google News Follow

Related

सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून मागणी वाढत आहे. सर्वांच्याच पसंतीला ही गाडी उतरली आहे. यामुळेच रेल्वे मंत्रालय आता या गाड्यांच्या उत्पादनात वाढ करत आहे. येत्या दोन महिन्यांत सहापेक्षा जास्त वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार आहे. मार्चपर्यंत एकूण १६ वंदे भारत गाड्या रुळावर आणण्याचे रेल्वे मंत्रालयाचे नियोजन आहे. मात्र, ऑगस्टपर्यंत ७५ वंदे भारत गाड्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आयसीएफच्या चेन्नई कारखान्यात तीन वंदे भारत गाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतून एकाच वेळी दोन वंदे भारत गाडयांना हिरवा कंदील दिला होता. महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी वंदे भारताची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे चार वंदे भारत गाड्या चालतात. त्यानंतर आता देशात विविध मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या १० झाली आहे.

देशातील पहिली वंदे भारत २०१९ मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत आठ राज्यांना वंदे भारताची भेट मिळाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला मिळत असलेली वाढती लोकप्रियता पाहून आता अनेक राज्यांनी त्याची मागणी सुरू केली आहे. आतापर्यंत दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड राज्यांना वंदे भारताची भेट मिळाली आहे.

हे ही वाचा:

पीएमश्री योजनेतून ८१६ शाळांचा होणार कायापालट

पहाटेचा शपथविधी; पवार-ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा

महाशिवरात्रीला घ्या १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

ते १५० वर तर हे अजून ‘५०’ वरच

सध्या असलेल्या आठ वंदे भारत गाडीने एकूण २३ लाख किलोमीटरचे अंतर कापले आहे. त्याच प्रमाणे आतापर्यंत ४० लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी या वंदे भारतने प्रवास केला आहे. भारतीय रेल्वेने४०० नवीन वंदे भारतसाठी निविदा काढल्या हेत. या गाड्या बनवण्यासाठी चार बड्या देशी-विदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या गाड्यांपैकी पहिल्या २०० वंदे भारत गाड्या चेअर कार गाड्या असतील. गाड्या तशी १८० किमी वेगाने धावण्यासाठी डिझाइन केल्या जातील. मात्र ट्रॅकवरील सुरक्षेचा विचार करून ते ताशी १३० किमी वेगाने धावतील. त्याच बरोबर २०० गाड्या स्लीपर कोचसाठी तयार करण्यात येणार आहेत. अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेल्या या गाड्या ताशी २२० किमी वेगाने धावतील. परंतु ट्रॅकवर त्यांचा वेग जास्तीत जास्त २०० किमी प्रति तास असेल. या सर्व ४०० गाड्या येत्या दोन वर्षांत तयार होतील.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा