26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषमहाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू मे महिन्यात

महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू मे महिन्यात

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी ही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे हे स्पष्ट होतेच आहे. पण मे ते जून या कालावधीत अवघ्या २३ दिवसांत मृतांची संख्या ही २० हजारापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाने प्रवेश केल्यापासून गेल्या १५ महिन्यांपैकी एकाच महिन्यात सर्वाधिक मृतांची संख्या पाहायला मिळाली.

मे महिन्यात ही संख्या २६५३१ इतकी होती. शिवाय, गेल्या वर्षी राज्यातील मृतांची आकडेवारी ४९५२१ इतकी होती ती आता ५०६०९ इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील ज्या शहरातून सर्वाधिक कोरोनाचे बळी गेले त्यात मुंबई, पुणे, ठाणे यांचा समावेश आहे. या तीन शहरातून अनुक्रमे १४९७१, १३३४८, ८२५७ इतके कोरोनाबळी गेले आहेत.

हे ही वाचा:

पहाटेच्या शपथविधीनंतर घरी घेतलं नसतं तर काय लायकी राहिली असती?

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?

‘तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन लागला तरी उद्योग सुरू ठेवा…’ ते कसे?

पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झालेली वृक्षतोड म्हणजे कुंपणच शेत खातंय

रविवारी महाराष्ट्राची कोरोनाबळींची संख्या आतापर्यंत १ लाखांपार गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती सुधारत असली तरी नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ दिवसांनी ती १२५५७ या संख्येवर आली आहे. मुंबईतील रोजच्या कोरोनाग्रस्तांची संख्या ७८६वर आली आहे.

आतापर्यंतच्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५८ लाख ३१ हजार ७८१ आहे त्यातून ५५ लाख ४३ हजार २६७ लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्राने लाखाचा आकडा पार केला असल्यामुळे आता जागतिक स्तरावर फ्रान्सच्या मागे महाराष्ट्राचा क्रमांक लागत आहे. फ्रान्समध्ये १ लाख ९ हजार लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत.

यासंदर्भात केईएमचे डीन अविनाश सुपे म्हणाले की, गेल्या लाटेच्या तुलनेत मृत्युचे प्रमाण कमी आहे. पण जर उत्तम व्यवस्था, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण असते तर आपण अनेक जीव वाचवू शकलो असतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा