आफ्रिकेतील नामीबिया येथून भारतात आणलेले चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशमधील पालनपुर येथील राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. सध्या पालनपुर राष्ट्रीय उद्यानात ८ चित्ते उत्तम स्थितित असून, दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात येण्याच्या प्रतीक्षेत असून, अद्याप या अधिकृत करारावर सही होऊ न शकल्याने चार महिन्यपासून या १२ चित्त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. चित्त्यांच्या शरीरार विलगीकरणांचा परिणाम होऊ शकतो. मात्र करारावर सह्या होऊन चित्ते भारतात येण्याच्या तयारीत आहेत.
सध्या आफ्रिकेतील जंगलापासून लांब असलेल्या या १२ चित्त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर तेथील वातावरणाचा परिणाम होऊन चित्त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिमाण होत असल्याची चिंता वन्यजीव तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये नामीबिया येथून आठ चित्ते भारतातील पालनपूर राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. तर त्यापाठोपाठ आणखी १२ चित्ते सुद्धा भारतात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
हे ही वाचा:
कुर्ल्यातील बलात्काराच्या घटनेबद्दल चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप
अमेरिकेतही गुजरात निवडणुकीची रणधुमाळी, कार रॅलीतून भारतीयांचे समर्थन
दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या यात्रेला म्हटलं ‘बारात’
लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!
हे चित्ते भारतात आणण्यासाठी सध्या प्रयत्न चालू असले तरी सरकारी पातळीवर समझोता करारावर सह्या होणे बाकी आहेत. तसेच एकूण १२ जणांच्या टोळीमध्ये ७ मादी व ५ नर भारतात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्त्यांना वेगळ्या कक्षेत ठेवण्यात आले आहेत. तेव्हा पासून या चित्त्यांनी एकही शिकार केली नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञानी व्यक्त केली आहे. तसेच हे चित्ते भारतात हस्तांतरित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला असून, आता अध्यक्षांकडून अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि त्यानंतर उभय देशांच्या सह्या होतील. त्यानंतर चित्त्यांना भारतात येण्याचा मार्ग सोयीस्कर होईल.