मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

गुजरात सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे.

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवर बांधण्यात आलेला झुलता पूल रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तसेच नदीत पडलेल्या १७७ जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. यातील १९ जणांवर उपचार सुरू असल्याचे गुजरातच्या माहिती विभागाने सांगितले आहे. दरम्यान, गुजरात सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे.

काल संध्याकाळी साडेसहा वाजता ही भीषण दुर्घटना घडली. मच्छू नदीवरील पूल कोसळताच तत्काळ तिन्ही सैन्य दलांचे बचावपथके घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेतील मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश आहे. या दुर्घटनेत गुजरातमधील खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदरिया यांच्या बारा नातेवाईकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेच्या तपासासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय समितीची स्थापना केली आहे. तसेच गुजरात सरकारने मोरबी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी हे घटनास्थळी आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील रोड शो रद्द केला.

हे ही वाचा:

तीन वर्षात तीस हजार तरुणांना जम्मू कश्मीरमध्ये नोकरीची संधी

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

विकेंडला मालवण हाऊसफुल्ल

मुख्यमंत्री आणि घटनात्मक व्यक्तिविरोधात ट्विट करणाऱ्या एकाला अटक

मोरबीचा हा झुलता पूल १४० वर्षांहून जुना आहे. एका खासगी कंत्राटदाराने या पुलाची डागडुजी केली होती. नुकतंच गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता.

Exit mobile version