हिंदू तरुणीने छेड काढणाऱ्या शोएब, इम्रान, सलमानला भररस्त्यात दिला चोप!

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील घटना

हिंदू तरुणीने छेड काढणाऱ्या शोएब, इम्रान, सलमानला भररस्त्यात दिला चोप!

हिंदू तरुणीची छेड काढणाऱ्या तिघांना बेदम चोप देण्यात आला आहे. परंतु, हा चोप स्थानिक नागरिकांनी नाहीतर स्वतः त्याच तरुणीने दिला आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन मुस्लीम तरुणांनी तरुणीची छेडछाड करत तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला. मात्र, तरुणीने शांत न बसता तिघांचा पाठलाग करत बेदम चोप दिला. मोहम्मद शोएब, इमरान आणि सलमान अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कांठ शहराशी संबंधित असून ८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली. तरुणी आपल्या चुलत भावासोबत मंदिरातून दर्शन करून परतत होती, याचवेळी तीन मुस्लीम हुल्लडबाज्यांकडून तरुणीची छेड काढत अश्लील शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, तरुणीने घाबरण्याऐवजी तिघांवर तुटून पडली आणि जबर चोप देण्यास सुरुवात केली. तरुणीचा हात गालावर पडताच तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पण धाडसी मुलीने त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडले आणि तिघांना चांगलाच चोप दिला.

हे ही वाचा : 

‘दुर्मिळ रत्न हरपले’

‘रतन टाटा यांना आयुष्यभर देशाचाच विचार’

‘रतन टाटा….एक युग संपले’

रतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना

आरोपी पळून जाऊ नयेत म्हणून तरुणीने त्यांची कॉलर धरून ठेवली, काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी मोहम्मद शोएब, इमरान आणि सलमान हे अफजलगड, गाझियाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मुस्लीम तरुणांना चोप देणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून धाडसी तरुणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महारावांचा नक्षा उतरविणारे शिरवडकर 'न्यूज डंका' वर | Mahesh Vichare | Rajesh Shirwadkar | Interview

Exit mobile version