भारतीय उपखंडावर मान्सूनचे आगमन वेळेवर

भारतीय उपखंडावर मान्सूनचे आगमन वेळेवर

नुकताच तौक्ते चक्रीवादळाचा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टील बसला होता. त्यामध्ये अनेकांचे नुकसान झाले, परंतु सध्या सर्वांसाठी सुखद बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदाचा मान्सून वेळेवर म्हणजेच २१ मे रोजी अंदमानला पोहोचणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून मान्सून वेळेवर भारताच्या मुख्यभूमीवर पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मान्सून २१ मेला अंदमान बेटांवर दाखल होणार

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच भारतीय उपखंडात पाऊस घेऊन येतात. या संपूर्ण प्रक्रियेलाच मान्सून असं म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हे वारे १ जूनला केरळमधील दाखल होणार आहेत. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार २१ मेला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील.

हे ही वाचा:

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

प्लाझ्मा थेरेपी आता बंद, कारण काय?

मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती

केरळमध्ये मान्सून १ जूनला

सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. यंदा मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती तर १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

मान्सूनचे आगमन वेळेवर?

गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

बंगालमधील अराजकता लोकशाही मूल्यांचा अस्त करणारी

जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश

टोकियो ऑलिम्पिक रद्द करा, स्थानिक डॉक्टरांची मागणी

महाराष्ट्राला अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाचा फटका

महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्याभरात अवकाळी पाऊस, गारपीट, पूर्वमोसमी पावसाचा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट देखील झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. तर, पूर्वमोसमी पावसामुळे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नदीला पूर देखील आलेला पाहायला मिळाला. तर नुकताच येऊन गेलेल्या वादळाचा फटका देखील राज्याला बसला आहे.

Exit mobile version