मान्सून जुलैपर्यंत वायव्य भारत व्यापेल!

हवामान खात्याचा अंदाज

मान्सून जुलैपर्यंत वायव्य भारत व्यापेल!

मान्सून संपूर्ण देशभरात आपली वाटचाल पुन्हा सुरू करणार असून ३ जुलैपर्यंत दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या प्रमुख कृषी राज्यांचा समावेश असलेला वायव्य भारत व्यापेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने एका नवीन अंदाजात म्हटले आहे. शेतकरी पाण्यासाठी पावसाकडे डोळे लावून बसले असताना ११ जूनपासून पाऊस मोठ्या प्रमाणात रखडला आहे. ‘आम्ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा करत आहोत आणि त्या कालावधीत जूनपासूनची तूट भरून काढली जाईल,’ असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी सांगितले.

हा मान्सून गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, उप-हिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, झारखंडचा काही भाग, बिहारचा आणखी काही भाग आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागांवर पुढील तीन ते चार दिवस प्रभाव पाडण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर २७ जूनपासून वायव्य आणि मध्य भारतात मान्सूनचा प्रभाव वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि पश्चिम राजस्थान वगळता देशातील बहुतेक भागांमध्ये पावसाची क्रिया सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नैऋत्य मान्सून मध्य भारताच्या उर्वरित भागांवर आणि उत्तरपश्चिम भारताच्या उर्वरित भागांमध्ये २७ जून ते ३ जुलै या कालावधीत मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. ला निना परिस्थिती ऑगस्टच्या आसपास विकसित होण्याची अपेक्षा आहे. तर, एल निनो ही विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशातील चक्रीय तापमानवाढ आहे, ज्यामुळे जगभरातील हवामानावर प्रभाव पडतो. भारतात, यामुळे सामान्यत: कमकुवत मान्सून हंगाम होतो. तर, ला निना ही उलट घटना आहे आणि ती भारतीय उपखंडातील अतिवृष्टीशी संबंधित आहे.

हे ही वाचा:

छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेखचा मृत्यू!

वाढवण, ग्रेट निकोबारच्या विरोधाचा बोलवता धनी कोण? कोणते हिंदी आहेत, चीनचे भाई भाई

ग्रेट निकोबारमधील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे काँग्रेसच्या पोटात पोटशूळ

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये चकमक, दोन दहशतवादी टिपले!

“मान्सून पुनरुज्जीवित होत आहे. मान्सून जुलैच्या पहिल्या आठवड्यात येईल. पुढील २-३ आठवडे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. आपल्याकडे सामान्य ते सामन्य पातळीपेक्षा अधिक मान्सून असेल, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि हवामानशास्त्रज्ञ विभागाचे माजी सचिव एम राजीवन म्हणाले. ला नीनामुळे ऑगस्टमध्ये सामान्यपेक्षा जास्त पावसाची अपेक्षा करू शकतो, असेही ते म्हणाले. “जोपर्यंत अल निनो येत नाही तोपर्यंत मान्सून सामान्य आणि चांगला राहील अशी आपण अपेक्षा करू शकतो,” रविचंद्रन म्हणाले.

भारतातील मान्सून देशाच्या वार्षिक पावसापैकी जवळपास ७० टक्के पाऊस पाडतो आणि देशाच्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनी सिंचनासाठी पावसावर अवलंबून असल्याने त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण आहे.
मान्सूनची प्रगती जवळपास नऊ दिवस रखडली होती. पुढील तीन ते चार दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश या भागांमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीची अपेक्षा हवामान विभागाने वर्तवली आहे.

Exit mobile version