१ जूनमध्ये मान्सून सरी बरसणार

१ जूनमध्ये मान्सून सरी बरसणार

हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज

कोरोना, टाळेबंदी यामुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला एक दिलासा मिळाला आहे. यंदा मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त जनतेसाठी हा मोठा दिलासा आहे.

भारतात शेतीसाठी मान्सून सशक्त असणे आवश्यक असते. अनेक शेतकरी अद्यापही कोरडवाहू शेती करत असल्याने वेळेवर येणारा मान्सून सुखावह असतो. यंदाचा मान्सून हा सशक्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

७ किलो युरेनियमसह दोघांना अटक, एटीएसची कारवाई

मुंबईतील सोसायट्यांमधील लसीकरणाचे निकष…

सत्ताधारी पक्ष ते प्रमुख विरोधी पक्षही नाही, काँग्रेसची अधोगती सुरूच…

नैऋत्य मोसमी मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर दक्षिणेकडील केरळ राज्यातून प्रवेश करतो. यावर्षीचा मान्सून १ जून रोजी वेळेवर केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे असल्याचे वर्तवले जात आहे. त्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत साधारण १५ ते १६ जून पर्यंत पाऊस महाष्ट्रातील घाटमाथ्यावर सर्वत्र पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या बाबत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “यंदा मान्सून वेळ म्हणजेच १ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा प्रारंभिक अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग १५ मे आणि ३१ मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवेल.”

मागील दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबला होता. मात्र, सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

Exit mobile version