मान्सून परत येतोय, हवामान विभागाकडून आनंदाची बातमी

सप्टेंबर महिन्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून परत येतोय, हवामान विभागाकडून आनंदाची बातमी

मान्सूनने विश्रांती घेतल्यामुळे संपूर्ण देशभरात नागरिकांचे डोळे पावसाकडे लागून राहिले होते. मात्र हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. सप्टेंबर महिन्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या अनेक दशकांत ऑगस्ट महिन्यात इतक्या कमी पावसाची नोंद झाली नव्हती. दक्षिण-पश्चिम मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या दक्षिण आणि मध्य भागांतील राज्यांत पुन्हा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.

सप्टेंबर महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. अर्थात सप्टेंबरमध्ये खूप पाऊस पडला तरीही जून ते सप्टेंबर या सत्रादरम्यानचा सरासरी पाऊस सर्वसामान्य पावसापेक्षा कमीच असण्याची शक्यता आहे.

भूमध्यरेखा पॅसिफिक महासागरात अल नीनोमुळे ऑगस्ट महिन्यात कमी पावसाची नोंद झाली, असे त्यांनी सांगितले. अरबी समुद्र आणि बंगालची खाडीच्या समुद्रसपाटीवरील तापमानामधील फरक आता ‘सकारात्मक’ होऊ लागला आहे. हा फरक अल नीनोच्या प्रभावावर परिणाम करू शकतो. पूर्व दिशेकडे वाहणाऱ्या ढगांची गती आणि उष्णकटीबंधीय क्षेत्रात होणारा पाऊस मान्सून पुन्हा सक्रिय होण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

हे ही वाचा:

झुरिच डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

केंद्र सरकारकडून ‘वन नेशन वन इलेक्शन’साठी समितीची स्थापना

मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू

राज्यात पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील पर्जन्यमानाचे आकडेही बदलले आहेत. राज्यात मान्सून हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. मात्र याच कालावधीत कोकणात सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त, मराठवाड्यात २१ टक्के कमी आणि विदर्भात १८ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे.

Exit mobile version