मान्सून बंगालच्या उपसागरात, मुंबईत यायला विलंब होणार?

येत्या दोन-तीन दिवसांत त्याची आणखी प्रगती अपेक्षित असून, तो मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील काही भाग व्यापेल

मान्सून बंगालच्या उपसागरात, मुंबईत यायला विलंब होणार?

मान्सूनने ३० मे रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग, तसेच संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे, अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये काही भाग व्यापला. सरासरी तीन दिवसांत प्रवास बंगालच्या उपसागरात होण्याचा अंदाज होता. मात्र, त्या आधीच म्हणजे बुधवारीच तो बंगालच्या उपसागरात दाखल झाला.  

अल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाल्याची माहिती आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून पुढे सक्रीय होऊन मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भाग, तसेच अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत त्याची आणखी प्रगती अपेक्षित असून, तो मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील आणखी काही भाग व्यापण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगितले जात आहे. मान्सून अरबी समुद्राकडील बाजूने केरळमधून भारतामध्ये दाखल होतो. यंदा तो ४ जूनला दाखल होण्याचा अंदाज यापूर्वीच जाहीर केला आहे. सध्या केरळमध्ये दाखल होण्याच्या त्याच्या सामान्य तारखेच्या तुलनेत आठ दिवस विलंब झाला. मात्र हे अंतर मान्सून पुढे भरून काढेल, असा अंदाज हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

शिवतीर्थ हा गप्पांचा फड का बनलाय?

राहुल गांधी यांनी दुसऱ्या दिवशीही अमेरिकेत मदतीसाठी पदर पसरला

स्वीडन युरोपमधील पहिला ‘धूम्रमुक्त’ देश होणार

कुस्तीगीरांच्या आखाड्यात उतरले राज ठाकरे

केरळमध्ये ३-४ जूननंतर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात ७ ते ९ जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीहून गुजरात, सौराष्ट्रकडे मार्गक्रमण करेल. मात्र या चक्रीवादळामुळे मान्सून मुंबईत १४ ऐवजी १७ जूननंतर दाखल होण्याची शक्यता हवामानविषयक माहिती देणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने वर्तवेली आहे. या अंदाजानुसार दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन १० ते १२ जून दरम्यान, तर मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ७ जूननंतर लागेल. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

Exit mobile version