हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा एक दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन

महाराष्ट्रात १० जूनला मान्सून धडकण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा एक दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन

बहुप्रतीक्षित मान्सूनचे अखेर भारतात आगमन झाले आहे. मान्सून कधीपासून सुरू होईल याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. बळीराजाही पावसाची वाट पाहत आपली मान्सूनपूर्व कामे मार्गी लावत होता. गतवर्षी मान्सून उशीरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षीही पुनरावृत्ती होईल या भीतीने मान्सूनच्या वाटेकडे साऱ्यांचेचं डोळे होते. शिवाय तापमानातही गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. दरम्यान, गुरुवार, ३० मे रोजी हवामान विभागाने मान्सून संदर्भात आनंदाची वार्ता दिली आहे. मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला आहे.

मान्सून उत्तर-पूर्व भारत आणि केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शिवाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दहा दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पावसाने गुरुवार, ३० मे २०२४ रोजी केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. तसेच कोकणात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या लष्कराला चीनची मदत!

काशी-मथुराच्या मशिदींवरील दावा मुस्लिमांनी सोडावा!

निक्की हेली यांची ‘त्यांना संपवून टाका’ या संदेशासह इस्रायली क्षेपणास्त्रावर स्वाक्षरी!

शशी थरूर यांच्या सहायकांना विमानतळावर अटक

प्रत्येकवर्षी मान्सून साधारण १ जून रोजी केरळात दाखल होतो. या वर्षी मान्सून ३१ मे रोजी केरळात येईल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता पण, एक दिवस आधीच म्हणजे ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला असून पुढच्या प्रवासात गती असल्याचेही दिसत आहे. पुढच्या दहा दिवसांत म्हणजेच १० जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Exit mobile version