मान्सून आला!! अंदमानात तीन दिवस आधीच दाखल झाल्याने उत्साह !

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ९ ते १५ जूनपर्यंत होण्याची शक्यता

मान्सून आला!! अंदमानात तीन दिवस आधीच दाखल झाल्याने उत्साह !

अंदमान-निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) आगमन झाले आहे. त्यामुळे अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी येथे मान्सून २२ मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे.सध्या तरी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असली तरी मान्सूनचा पुढील प्रवास सुरळीत राहिल्यास लवकरच केरळ आणि पुढे गोवा, महाराष्ट्रातही दाखल होऊ शकतो.दरवर्षी केरळमध्ये १ जूनला पावसाचे आगमन होते. मात्र यंदा तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३ ते ४ दिवसांत दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो.

हे ही वाचा:

बराक ओबामासह ५०० अमेरिकन नागरिकांना रशियात ‘नो एन्ट्री’

ऋषी सुनक यांचे एका वर्षात २००० कोटींहून अधिक नुकसान !

सिद्धरामय्या यांनी शपथ घेतल्यानंतर राहुल गांधींनीही घेतली ‘शपथ’

”वाघशीर”; समुद्री चाचण्यांसाठी झाली सज्ज !

त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा दोन दिवस अगोदरच मान्सून शुक्रवारी (१९ मे) अंदमानात दाखल झाला आहे.मान्सूनच्या पावसावर ‘एल निनो’चे सावट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे.दुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ९ ते १५ जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version