WHO कडून ‘मंकीपॉक्स’ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित!

WHO कडून ‘मंकीपॉक्स’ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित!

The World Health Organization in Geneva has faced criticism from President Trump over its handling of the pandemic.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘मंकीपॉक्स’ आजरासंबंधित मोठा निर्णय घेतला आहे. जगातील ७० हून अधिक देशांत मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शनिवार, २३ जुलै रोजी जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे.

मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही एक असाधारण परिस्थिती असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक ट्रेडॉस अधनॉम घेब्रेयेसस यांनी डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसतानाही जागतिक आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.  जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस यांनी आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली.

 

७० देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या आहेत. भारतातही तीन रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात मंकीपॉक्सच्या १४ हजार रुग्णसंख्येची पुष्टी केली आहे. २००७ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर केलेली सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.

Exit mobile version