ज्या भागात तृणमूल काँग्रेसला भरभरून मतदान झाले नाही त्यांना विकासकामांसाठी पैसे मिळणार नाहीत, असे पश्चिम बंगालचे मंत्री उदयन गुहा यांनी शुक्रवार, १४ जून रोजी जाहीर केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तसेच, ज्यांनी तृणमूलला मतदान केले त्यांना प्रतिस्पर्धी भाजपला मतदान करणाऱ्यांपेक्षा प्राधान्य दिले जाईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
उदयन गुहा म्हणाले, ‘मी माथाभंगा एकच्या विकासासाठी चार कोटी रुपये आणि माथाभंगा दोनच्या विकासासाठी १० कोटी रुपये मंजूर केले होते.
माथाभंगा शहर, कूचबिहार शहर आणि माझ्या स्वत:च्या दिनहाटा शहरासाठी मी पैसे दिलेले नाहीत. शहरात राहणारे लोक स्वतःला गावात राहणाऱ्यांपेक्षा जास्त हुशार समजतात. त्यांना त्यांच्या भागात विकास हवा आहे की धार्मिक राजकारण… याचा निर्णय त्यांनी घ्यावा,’असे त्यांनी आवर्जून नमूद केले.प्रसारमाध्यमांशी बोलतानाही उदयन गुहा यांनी तृणमूलला जास्त मते दिल्याने गावातील लोकांना प्रथम फायदा होईल, असे वक्तव्य केले होते.
‘प्रत्येकाला शेवटी पैसे मिळणारच आहेत. ग्रामीण भागातील ज्या लोकांनी आम्हाला मतदान केले आणि ज्यांना ज्याची सर्वांत जास्त गरज आहे, त्यांना प्रथम आर्थिकनिधी दिला जाईल,’ असे ते म्हणाले.‘काहीतरी मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे, याची जाणीव आधी शहरातील लोकांना होऊ द्या,’असे सांगत उदयन गुहा यांनी भाजपच्या मतदारांना सावध केले. ‘होय, शहरातील लोकांना निधी नाकारला जाईल. थेट नाकारला जाणार नाही, परंतु जे सर्वाधिक पात्र आहेत, त्यांना तो प्रथम मिळेल,’ असे गुहा म्हणाले.
हे ही वाचा..
रेणुकास्वामी हत्येचा बेंगळुरू पोलिसांनी असा लावला छडा!
‘डीपफेक’ तंत्रज्ञानाला आळा घालण्यासाठी सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार!
‘दिल्लीच्या जलसंकटावर आतिशी खोटे बोलत आहेत’
दहशतवादविरोधी कारवाया तीव्र होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक
गुहा यांनी लोकांच्या मतदानाच्या पसंतींवर आधारित त्यांच्या भेदभावाची तुलना ‘रसगुल्ला खाण्याशी’ केली.“मी पाच रुपये दिले तर मी १० रुपयांचा रसगुल्ला खाऊ शकत नाही. १० रुपयांचा रसगुल्ला खाण्यासाठी मला १० रुपयेच दिले पाहिजेत,’ असे दिनहाटा मतदारसंघातील तृणमूलचे आमदार गुहा म्हणाले.संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक शोषणाला कमी लेखण्याचा प्रयत्न या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उदयन गुहा यांनी केला होता.
‘शेख शाहजहानला कटाचा एक भाग म्हणून फसवण्यात आले आहे की नाही, याबाबत मी निश्चित काहीच सांगू शकत नाही, परंतु त्याच्यावरील आरोप चुकीचे आहेत. त्याला फसवणुकीने गोवण्यात आले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यापासून हे घडत आहे. आम्ही याआधी शेख शहाजहानवर अशा प्रकारचे आरोप कधीच ऐकले नाहीत,’ असे सांगत गुहा यांनी शेख शाहजहानला क्लीन चिट दिली होती. मुख्य म्हणजे गुहा यांच्यावरही लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.