24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषस्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोईनुद्दीनला अटक

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोईनुद्दीनला अटक

उत्तर प्रदेशातील बिजनौर शहरातील घटना

Google News Follow

Related

आपल्या अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून बलात्कार केल्याप्रकरणी शनिवारी नराधम बापाला पोलिसांनी शनिवारी अटक केली. उत्तर प्रदेशातील बिजनौर शहरात ही घटना घडली. मोईनुद्दीन असे आरोपीचे नाव आहे.
मोईनुद्दीन याने वर्षभरात आपल्या १७ वर्षांच्या चिमुरडीवर अनेकदा बलात्कार केला. शुक्रवारी (१६ ऑगस्ट) पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मोईनुद्दीनला अटक करण्यात आली.

मंडळ अधिकारी अंजनीकुमार चतुर्वेदी यांनी या घटनेला दुजोरा दिला. आरोपीला त्याच्या पत्नीने आपल्या मुलीच्या लैंगिक शोषणाबाबत जाब विचारताच त्याने त्वरित तिहेरी तलाकचा उच्चार केला, त्यानंतर पत्नीने पोलिसांकडे पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर त्याच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. मोईनुद्दीनला शनिवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर BNS च्या संबंधित तरतुदी आणि बाल लैंगिक गुन्हे प्रतिबंधक (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या पत्नीला २ आठवड्यांपूर्वी तिच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली होती.

हेही वाचा..

ममता बॅनर्जींना शिवीगाळ करणाऱ्यांची ‘बोटे तोडा’

धक्कादायक! अग्नीविराचा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, ५० लाखांचे दागिने केले फस्त !

बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बोरिवलीत जनआक्रोश

नाशिकमध्ये दोन महिलांसह तीन बांग्लादेशींना अटक !

पीडितेने आपल्या आईला या गुन्ह्याची माहिती दिली होती. अटक करण्यापूर्वी मोईनुद्दीनने आपल्या मुलीवर केसांना तेल लावण्याच्या बहाण्याने बलात्कार केला होता. तसेच त्याने आपल्या अल्पवयीन पीडितेला घरातील इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा