… अन् मोहित्यांना दिसला मोत्यांमध्ये राम

… अन् मोहित्यांना दिसला मोत्यांमध्ये राम

स्वतःचे मुल मतिमंद म्हणून जन्माला आल्यानंतर नाराज न होता किंवा खचून न जाता पेणच्या स्वाती मोहिते यांनी इतर मतीमंद मुलांना मदत व्हाव्ही, या उद्देशाने आई डे केअरची स्थापना केली. आज या संस्थेचा वटवृक्ष तयार झाला आहे. तब्बल ७० मुलांची मोफत निवासी शिक्षण व्यवस्था दिमाखात उभी राहिली आहे. चांगल्या उपक्रमाला समाजातील दानशूर पुढे येतात, तसेच या संस्थेच्या बाबतीतही घडले आणि अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाला हातभार लावला.

या संस्थेत एक किस्सा घडला. मोत्यांमधे राम दिसला नाही म्हणून सीतेने प्रेमाने दिलेल्या माळेतील सर्व मणी हनुमानाने फेकून दिले होते, ही गोष्टं काल हनुमान जयंतीला एका संस्था भेटीत प्रकर्षाने आठवली पण ती उलट्या अर्थाने. स्वाती मोहितेना या मतिमंद मुलांमध्येही राम दिसला आणि त्या प्रत्येकाला त्यांनी अनमोल मोती बनविण्याचे शिवधनुष्य हाती घेतले.
आज या मतीमंद मुलांसाठी शालेय आणि व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण देण्याचे अत्याधुनिक आणि सृजनशील असे विशेष पॅटर्न पहायला मिळतात. या शिवाय त्यांचे उपचार, ऑक्यूपेशनल , फिजिओ थेरपी, व्यायाम, स्पोर्ट्स, अन्य उपक्रम या साठीच्या सर्व व्यवस्था उपलब्ध आहेत.

हेही वाचा..

मुर्शिदाबादमधील हिंसाचार, मृत्यूंच्या चौकशीसाठी हवे विशेष पथक

मेहुल चोक्सीला द्यावा लागणार तीर्थ-प्रसादाचा हिशोब… काँग्रेसला नवा ताप

मुझफ्फरनगर: तरुणीचा हिजाब उतरवायला लावून सोबतच्या हिंदू तरुणाला मारहाण

मेहुल चोक्सीच्या अटकेवर बेल्जियमची पहिली प्रतिक्रिया, म्हटले…

नर्सरी, पूर्व प्राथमिक, प्री वोकेशनल, एन आय ओ एस, व्यावसायिक अश्या पाच भागात वर्ग चालतात, आणि २५ वर्षाच्या वरील वयोगटासाठी स्वयंवर्ग चालविले जातात. तिथे त्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन, बनविलेल्या वस्तू विक्रीतून २ हजार ते ४ हजार पर्यंत त्यांना मानधन दिले जाते.

स्वाती ताई आणि त्यांचे पती महेंद्र दादा या दोघांच्या कार्याला खरोखरच सलाम आहे. समाजातला खूप मोठा आणि किचकट प्रश्न ते मोठ्या हिंमतीने हाताळत आहेत, मुलांच्या मानसिक शारारिक प्रश्र्नांपासून ते संस्थेसाठीची सर्व प्रकारची जमवाजमव सांभाळताना त्यांचे रोजचे जगणे आव्हानात्मकच आहे , त्यांचा संघर्ष आपल्याकडून काही प्रमाणात सुकर होण्याकरिता जर सहकार्याचा प्रयत्न केला तर या मोत्यां मध्ये आपल्याला ही राम दिसेल!

Exit mobile version