अयोध्येत २२ जानेवारीला राम लल्लाच्या अभिषेकची तयारी जोरात सुरू झाली आहे. सर्व कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोजित करणार आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांना आमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, मंदिराच्या पुजार्यांचीही चर्चा जोरात सुरू आहे. नुकतीच मंदिरातील पुजारी निवडीची प्रक्रिया सुरू होती.आता ही निवड प्रक्रिया संपली असून राम मंदिराच्या पुजाऱ्यासाठी मोहित पांडे यांची निवड करण्यात आली असून अन्य ४९ पुजाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
मोहित पांडे यांची अयोध्या राम मंदिरात पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. मोहित हा गाझियाबादचा रहिवासी आहे. तीन हजार लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर मोहितची निवड करण्यात आली. त्याच्याशिवाय इतर ४९ जणांचाही समावेश आहे. निवड झाल्यानंतर मोहित आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना ६ महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे ही वाचा:
शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!
कमाल झाली ! बसतिकिटाची मशीन चोरणाऱ्या चोरानेच कंटक्टरला विचारले तिकीट
काश्मीरमध्ये दगड फेकणारी मुलगी बनली फुटबॉलपटू; पंतप्रधानांनी घेतली दखल
कोण आहे मोहित पांडे?
मोहित पांडेने दुधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्षे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते तिरुपतीला गेले. ईटीव्ही भारतच्या वृत्तानुसार, पीठाधीश्वर श्री महंत नारायण गिरी यांनी सांगितले की, भगवान दूधेश्वरांच्या कृपेने मोहितला प्रभू रामाची सेवा करण्यासाठी निवडण्यात आले आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना येथे वेद आणि विधी शिकवले गेले आहेत. आम्ही गेल्या २३ वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहोत.
संस्थेत आचार्यपद भूषविणाऱ्या नित्यानंद यांनी सांगितले की, मोहित पांडे यांनी दुधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्षे शिक्षण घेतले, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठात गेले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना धर्म आणि कर्मकांडाचे ज्ञान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून त्यांना स्वतःचे चांगले भविष्य साधण्यास मदत होईल.