‘मोहम्मद युनूस’ हे हिंदूंचे मारेकरी!

संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर लोकांची निदर्शने

‘मोहम्मद युनूस’ हे हिंदूंचे मारेकरी!
बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयाबाहेर शुक्रवारी (२७ सप्टेंबर) प्रचंड निदर्शने झाली. निदर्शक न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयाबाहेर पोहोचले आणि रागाच्या भरात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करू लागले. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा हातामध्ये फोटो घेवून आंदोलकांनी मुहम्मद युनूस यांना दहशतवादी, अल्पसंख्याकांचा खुनी (बांगलादेशातील हिंदूंच्या संदर्भात) संबोधले. ते म्हणाले की, मोहम्मद युनूस हा हिंदूंचा खुनी आहे. अशा स्थितीत त्यांनी माघारी जाऊन तातडीने पदावरून पायउतार व्हावे. यूएन मुख्यालयाबाहेरही लोकांनी ‘दहशतवादी, अल्पसंख्याक हत्यारे, हिंदू हत्यारा युनूस, मागे जा, पायउतार व्हा’ अशा घोषणा दिल्या.

हसीना शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात कट्टरवाद्यांनी अल्पसंख्याकांना लक्ष्य केले, ज्यामध्ये हिंदू प्रमुख लिस्टमध्ये होता. हिंदूंची घरे-मंदिरे तोडली, चोरी, हत्या असा अत्याचार हिंदुंवर केला. अजूनही काही भागातून अशा घटना समोर येत आहेत. दरम्यान, याच मुद्यावरून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा सत्रात उपस्थित राहिलेल्या मोहम्मद युनूस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोहम्मद युनूस संयुक्त राष्ट्र संघात बांगलादेशचे प्रतिनिधित्व करत आहेत.

हे ही वाचा : 

अतिरेकी धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई ‘हाय अलर्टवर’

पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नीमधील वाद विकोपाला !

जगन मोहन रेड्डी यांनी तिरुपती मंदिराची यात्रा रद्द केली

हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद नसरल्ला ‘ठीक-ठाक’, परंतु मुलगी झैनब ठार?

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आंदोलकांपैकी एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही येथे अशा व्यक्तीच्या विरोधात आहोत, जो निवडून आलेला नाही आणि तो देशाचे बेकायदेशीरपणे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांना बंगादेशाच्या १७० दशलक्ष लोकांच्या वतीने बोलण्याचा अधिकार नाही. ५० वर्षांपूर्वी याच ठिकाणी राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांनी बंगाली भाषेत जगाला संबोधित केले होते आणि आज डॉ. युनूस यांनी इंग्रजीत व्याख्यान दिले आहे.

Exit mobile version