मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर, दीपक चहरची वनडेतून माघार

भारताचे दोन वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर

मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर, दीपक चहरची वनडेतून माघार

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारताचे दोन वेगवान गोलंदाज बाहेर पडले आहेत. मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमी फिटनेस चाचणी उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरला आहे, तर दीपक चहरने एकदिवसीय मालिकेतून रजा मागितली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी १६ डिसेंबर रोजी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

 

बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मोहम्मद शमीला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मान्यता दिलेली नाही आणि हा वेगवान गोलंदाज दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडलेला आहे. दुसरीकडे दीपक चहरने बीसीसीआयला आपण उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. हा वेगवान गोलंदाज सध्या कौटुंबिक आणीबाणीतून जात आहे. दीपक चहरने बीसीसीआयला कळवले आहे की, तो कौटुंबिक, वैद्यकीय कारणामुळे आगामी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही. त्याच्या जागी आकाश दीपची निवड केली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

हेही वाचा :

‘राज्य मासा’ असलेल्या पापलेट माशासाठी शासनाचे पाऊल

‘अमेरिकेत खलिस्तानी आंदोलनाला स्थान नाही’

‘राज्य मासा’ असलेल्या पापलेट माशासाठी शासनाचे पाऊल

‘देशासाठी दान द्या’ म्हणत काँग्रेसकडून जनतेकडे पैशांची मागणी

फलंदाज श्रेयस अय्यर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात एकदिवसीय संघाचा भाग नसेल आणि त्याऐवजी तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होईल, असेही बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. मधल्या फळीतील अय्यर कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. वनडे विश्वचषक २०२३ नंतर प्रथमच क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टी-२० मालिकेत राहुलने माघार घेतली होती.

भारताचा वनडे संघ

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुधारन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप.

Exit mobile version