28 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरविशेषमोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

ब्रिटनमध्ये होणार गुडघ्यावर होणार शस्त्रक्रिया

Google News Follow

Related

वनडे विश्वचषक २०२३ नंतर मोहम्मद शमी एकही सामना खेळलेला नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर राहिला आहे. काही दिवसांनी खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२४ मधूनही मोहम्मद शमी बाहेर पडल्याचे वृत्त समोर आले आहे. शमीचे स्पर्धेतून बाहेर पडणे हा गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मोहमद शमी हा गुजरात टायटन्सचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे. गेल्या मोसमात म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने १७ सामन्यांत १८.६१च्या सरासरीने २८ विकेट्स घेतल्या होत्या.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमी डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. शमीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, ती ब्रिटनमध्ये करण्यात येणार आहे.

शमीला गुजरात संघाने २०२२ च्या मेगा लिलावात ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर तो संघासाठी एक यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे. शमी यापूर्वी पंजाब किंग्ज इलेव्हनचा भाग होता. शमीने आतापर्यंत एकूण ११० आयपीएल सामने खेळले आहेत. ११० डावात गोलंदाजी करताना त्याने २६.८६ च्या सरासरीने १२७ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा :

आंध्र प्रदेशात सर्वाधिक ‘लखपती दीदी’

‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चे नेटफ्लिक्सवरील प्रदर्शन मुंबई हायकोर्टाने थांबवले!

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”

शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू

विश्वचषक २०२३ च्या वनडेत सर्वाधिक विकेट्स
शमीने २०२३ मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात कमाल केली होती. २०२३ च्या स्पर्धेत शमी भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. शमीने २०२३ च्या वनडे विश्वचषकात केवळ ७ सामने खेळले आणि १०.७१ च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या पहिल्या चार सामन्यात तो खेळला नव्हता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा