24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषचिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला खेलरत्न तर शमीला अर्जुन

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला खेलरत्न तर शमीला अर्जुन

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने २०२३ साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची केली घोषणा

Google News Follow

Related

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदाच्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. स्टार भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे.या सर्व खेळाडूंना ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये पॅरा अॅथलीट शीतल देवीचा देखील समावेश आहे.चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.मेजर ध्यानचंद खेल रत्न हा भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. हे सर्व पुरस्कार या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत.तसेच क्रीडा मंत्रालयाकडून सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

इंडी आघाडीच्या बैठकीत काही ठोस निर्णय नाही

कंगना रनौत लोकसभेच्या मैदानात उतरणार

लोकसभेच्या आणखी दोन खासदारांचे निलंबन; निलंबित खासदारांची संख्या १४३

पुजाऱ्याच्या हत्येचे कारण झाले स्पष्ट…

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२३
१. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)
२. रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार २०२३
१. ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
२. अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
३. श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स)
४. पारुल चौधरी (अॅथलेटिक्स)
५. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
६. आर वैशाली (बुद्धिबळ)
७. मोहम्मद शमी (क्रिकेट)
८. अनुष अग्रवाला (अश्वस्वार)
९. दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज)
१०. दिक्षा डागर (गोल्फ)
११. कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
१२. पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)
१३. पवन कुमार (कब्बडी)
१४. रितू नेगी (कब्बडी)
१५. नसरीन (खो-खो)
१६. सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)
१७. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
१८. सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)
१९. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
२०. अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
२१. सुनील कुमार (कुस्ती)
२२. सुश्री अँटिम (कुस्ती)
२३. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
२४. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
२५. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
२६. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार
१. ललित कुमार (कुस्ती)
२. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)
३. महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स)
४. शिवेंद्र सिंग (हॉकी)
५. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा