27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमहंमद रफी : चंदेरी दुनियेचा सोनेरी आवाज

महंमद रफी : चंदेरी दुनियेचा सोनेरी आवाज

महंमद रफी चंदेरी दुनियेचा सोनेरी आवाज

Google News Follow

Related

‘शोधीसी मानवा राउळी अंतरी’ हे गाणे आज सकाळीच रेडिओवर ऐकले आणि मन भूतकाळात रमले. हा सुमधुर आवाज होता महान गायक महम्मद रफी यांचा. आज २४ डिसेंबर ही रफी यांची जयंती.

ह्या मधुर आवाजात आपण एकापेक्षा एक सरस गाणी ऐकली. फक्त हिंदी आणि मराठीतच नाही तर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि हा सोनेरी आवाज होता महंमद रफी यांचा.  त्यांचा आवाज ठरावीक असा एकाच शैलीचा नव्हता. रफी यांनी संगीतातील अनेक रागातील गाणी गाऊन अजरामर केली. यांत उदाहरणादाखल जॉनी वॉकर वर चित्रित केलेले सर जो तेरा चकराये , सीआयडी मधील ए दिल ए मुश्किल असो याशिवाय विश्वजित,भारत भूषण,जॉय मुखर्जी अशा कितीतरी कलाकारांवर चित्रित केलेली गाणी आपण ऐकू शकता.

मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ ला पंजाबी जाट मुस्लिम कुटुंबात अल्ला राखी आणि हाजी अली मोहम्मद यांना जन्मलेल्या सहा भावांपैकी मोहम्मद रफी हे दुसरे अपत्य होते. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात कोटला सुलतान सिंग या गावी झाला. गावांत रस्त्यावर फिरणाऱ्या फकिराने मंत्र गाऊन गाऊन रफी साहेब गाणे म्हणू लागले. तिथे त्यांच्या गाण्याला खरी सुरवात झाली. रफी यांनी उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवन लाल मट्टू आणि फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकले. त्यानंतर मुंबईत ते १९४४ साली आले

रफीनी आपल्या हिंदी चित्रसृष्टीतील प्रत्येक नटाच्या चेहेऱ्याचे अचूक हावभाव आपल्या आवाजातून उत्कृष्ट सादर केले. या सर्व गाण्यांमध्ये त्यांना अनेक गायिकांनी सुद्धा सुंदर साथ दिली. हिंदी चित्रपटासाठी त्यांनी हजार पेक्षा जास्त चित्रपटात गाणी गायली तर इतर भाषांमध्ये त्यांनी मुख्यतः उर्दू आणि पंजाबी मध्ये, तसेच कोकणी,भोजपुरी,ओडिया,तामिळ,तेलगू,गुजराती,कन्नड, सिंधी बंगाली आणि मराठीत सुद्धा गाणी गायली आणि ती अजूनही आपण तितक्याच गोडीने ऐकतो.

रफींची एकूण ध्वनिमुद्रित केलेली गाणी ही ७००० सात हजारच्या आसपास आहेत. रफी साहेबांनी पहिल्यांदा वयाच्या १३ व्या वर्षी आपले गाणे सादर केले. त्यानंतर आपली चित्रपटाची कारकीर्द १९४१ पासून सुरु केली. गुल बलोच या पंजाबी चित्रपटात पार्श्व गायक म्हणून त्यांनी पहिल्यांदा गाणे गायलं त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नौशाद,ओ पी नैय्यर, शंकर जयकिशन ,एस डी बर्मन,आणि रोशन अशा दिग्गज संगीतकारांबरोबर काम केले.

एस डी बर्मन यांनी देवानंद आणि गुरुदत्त यांच्यासाठी रफीसाहेबांचा आवाज घेतला. यांत प्यासा, कागज के फूल,काला बाजार,नौ दो ग्यारह,कला पानी, तेरे घर के सामने अशा अनेक चित्रपटात त्यांनी मुख्य नायकांना आपला आवाज दिला. शंकर जयकिशन, रवी, मदनमोहन,ओ पी नैय्यर ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,कल्याणजी आनंदजी, सी. रामचंद्र, राजेश रोशन आणि इतर अनेक संगीतकारांबरोबर काम केले.

हे ही वाचा : 

भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीचा अपघात

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदाराने केली सावरकरांच्या स्मारकासाठी मागणी

क्रांतिकारक पाऊल; सौदी अरेबियात परिक्षा केंद्रात हिजाब बंदी

हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त रफींनी मराठीत अनेक उत्तम गाणी गायली. यात कोळी गीते, आणि भक्ती गीतांचा समावेश जास्त आहे. विशेषतः श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली आणि वंदना विटणकर यांच्या अनेक रचना खरंच खूप सुंदर आहेत. प्रत्येक वेळेस रफीचा आवाज आपल्या काळजाचा ठाव घेतात जसे हे मना आज तू , शोधिसी मानवा, किंवा हसा मुलांनो हसा अशी किती तरी गाणी आपण ओठावर सहज गुणगुणू शकतो तर अग्ग पोरी सांभाळ दर्याला सांभाळ हे पुष्पा पागधरे यांच्याबरोबर गायलेले खट्याळ गीत असो आज मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुमधुर आवाजाच्या स्मृतींना हा शब्दरूपी उजाळा. या महान गायकाला सलाम.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा